शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

८०० कि.मी. अंतराची ‘टायगर लँड’ अ‍ॅडव्हेन्चर रॅली

By admin | Updated: January 4, 2015 00:58 IST

प्रजासत्ताक दिनानिमित्त विदर्भ आॅटोमोटिव्ह रेसिंग असोसिएशनच्या वतीने(वारा) ८०० किलोमीटर अंतराची टायगर लँड अ‍ॅडव्हेंचर रॅलीचे आयोजन २४ जानेवारी रोजी करण्यात येत आहे.

वाराचे आयोजन : दुचाकी, चारचाकी वाहनांचा सहभागनागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त विदर्भ आॅटोमोटिव्ह रेसिंग असोसिएशनच्या वतीने(वारा) ८०० किलोमीटर अंतराची टायगर लँड अ‍ॅडव्हेंचर रॅलीचे आयोजन २४ जानेवारी रोजी करण्यात येत आहे.मोटरसायकल आणि चारचाकी वाहनांसाठी असलेल्या या रॅलीत केवळ ३० स्पर्धकांना प्रवेश राहील. विविध गटातील विजेत्याना एकूण दोन लाख रुपयांची रोख पारितोषिके आणि ट्रॉफी देण्यात येतील, अशी माहिती वाराचे अध्यक्ष मेहरनोश मवालवाला यांनी पत्रपरिषदेत दिली.मनपाच्या नागपूर महोत्सवाचा भाग असलेल्या या रॅलीत सहभागी स्पर्धकांशिवाय अ‍ॅडव्हेंचर सफारीचा आनंद घेण्यासाठी इच्छुक असलेल्यांनादेखील रॅलीच्या मार्गाने वाहन चालविण्याचा अनुभव घेता येईल. वोक्सवॅगनने ही स्पर्धा पुरस्कृत केली आहे. तीन दिवसांच्या या रॅलीची दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. २४ जानेवारी रोजी सकाळी देशपांडे सभागृहाबाहेर रॅलीचा प्रारंभ झाल्यानंतर बोर टायगर पार्क, कुरई पार्क सातपुडा पर्वतरांगा असा ५०० कि.मी.चा प्रवास पूर्ण करेल. दोन रात्री स्पर्धकांना विश्रांती घेता येईल. रॅलीचा समारोप कान्हा राष्ट्रीय पार्कमध्ये २५ ला होईल. पुरस्कार वितरण कान्हा येथेच २६ ला सकाळी केले जाणार आहे. स्पर्धेत १८ स्पर्धकांनी प्रवेश निश्चित केले आहेत. उर्वरित १२ स्पर्धकांसाठी ‘प्रथम या प्रथम मिळवा’ या तत्त्वावर १० जानेवारीपर्यंत प्रवेश दिले जातील. मोटर स्पोर्टस् फेडरेशनच्या वार्षिक वेळापत्रकात या रॅलीचा समावेश असल्याचे मवालवाला यांनी सांगितले.स्पर्धकांची काळजी घेण्यासाठी नियमानुसार चोख वैद्यकीय व्यवस्था करण्यात येईल, असे ते म्हणाले. पत्रपरिषदेला वाराचे चेअरमन शब्बीर वली, छत्तीसगड पर्यटन विभागाच्या अधिकारी पल्लवी शिंपले, रॅली आयोजन समितीचे चेअरमन निशिकांत जाधव, वाराच्या मोहीम समितीचे चेअरमन संदीप देशमुख आदींची उपस्थिती होती. (क्रीडा प्रतिनिधी)