शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  ३ हजार ले-आऊटच्या विकासासाठी हवेत ८०० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 01:24 IST

नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र) च्या कार्यक्षेत्रात येणारे जवळपास तीन हजार अभिन्यास (ले-आऊ ट) महापालिकेला हस्तांतरित होणे अपेक्षित आहेत. या अभिन्यासात मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. येथील विकास कामांसाठी ७०० ते ८०० कोटींची गरज आहे. मात्र नासुप्रने यासाठी ९३ कोटींचा निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. अशा परिस्थितीत या अभिन्यासाचा विकास कुणी करावा या वादात अभिन्यासाचे हस्तांतरण अडकले आहे.

ठळक मुद्देअविकसित ले-आऊटमध्ये सुविधांचा अभाव : शुल्क जमा करूनही नासुप्रची ९३ कोटीची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र) च्या कार्यक्षेत्रात येणारे जवळपास तीन हजार अभिन्यास (ले-आऊ ट) महापालिकेला हस्तांतरित होणे अपेक्षित आहेत. या अभिन्यासात मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. येथील विकास कामांसाठी ७०० ते ८०० कोटींची गरज आहे. मात्र नासुप्रने यासाठी ९३ कोटींचा निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. अशा परिस्थितीत या अभिन्यासाचा विकास कुणी करावा या वादात अभिन्यासाचे हस्तांतरण अडकले आहे.राज्य सरकारने दीड वर्षापूर्वी नासुप्र बरखास्त करण्याला तत्त्वत मंजुरी दिली होती. डिसेंबर २०१७ यासाठी डेडलाईन निश्चित करण्यात आली होती. परंतु नासुप्र बरखास्त व अभिन्यास हस्तांतरण करून चालणार नाही. अभिन्यासातील विकास कामांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. विकास न करताच अभिन्यास महापालिकेला हस्तांतरित केले तर याचा आर्थिक बोजा महापालिकेवर पडणार आहे. यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता सध्या निधी खर्च करण्याजोगी परिस्थिती नाही.विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नासुप्रचे अभिन्यास महापालिकेला तातडीने हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहे. परंतु आर्थिक स्थिती विचारात घेता महापालिक  यासाठी राजी नसल्याचे चित्र आहे. अभिन्यास महापालिकेला हस्तांतरित करण्यात आले तरी या भागातील विकास कामांसाठी अनेक वर्ष लागणार असल्याची शंका जाणकारांनी व्यक्त केली आहे. सध्या अभिन्यास नासुप्रच्या कार्यक्षेत्रात असल्याने त्यांना येथे पाणीपुरवठा, रस्ते, गडर लाईन अशा मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्या लागत आहेत. अनधिकृत अभिन्यास विकासित करण्याच्या नावाखाली नासुप्रने नागरिकांकडून मोठा निधी जमा केला आहे. परंतु नागरिक सुविधापासून वंचित आहेत.किमान ५०० कोटींची गरजनासुप्रच्या अधिकार क्षेत्रात जवळपास तीन हजार अभिन्यास आहेत. यातील अर्ध्याहून अधिक अभिन्यासांचा विकास झालेला नाही. अभिन्यास हस्तांतरित करून घेण्याला महापालिकेने सहमती दर्शविल्यास या भागातील विकास कामांसाठी किमान ५०० कोटींचा निधी लागणार आहे. परंतु नासुप्रची जेमतेम ९३ कोटी शिल्लक असल्याचे सांगत आहे. त्यामुळे अभिन्यास हस्तांतरण सोपे नसल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष व नासुप्रचे विश्वस्त वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाNagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यास