शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

८० टक्के शेतकऱ्यांनी काढला पीक विमा; १२०० कोटी रुपयांचे संरक्षण

By गणेश हुड | Updated: August 8, 2023 14:59 IST

मागील वर्षाच्या तुलनेत चांगला प्रतिसाद मिळाला

नागपूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. केवळ एका रुपयात पीक विमा दिला जात आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात नागपूर  जिल्ह्यामध्ये २७ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. मात्र यावर्षी २ लाख ३३ हजार शेतकरी या योजनेचा  लाभ घेत आहे. विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ८० टक्के झाली आहे. या शेतकऱ्यांना १ हजार २५५ कोटींचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. 

 प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अंतिम तारीख ३ ऑगस्ट २०२३ पर्यंत होती.  आधी ती ३० जूलै पर्यंत होती. या  योजनेला मुदतवाढ देण्यात आली  होती. अशी माहिती जिल्हाधिकारी  डॉ. विपीन इटनकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. 

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१६ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. ही योजना खरीप हंगाम २०२० पासून तीन वर्षांसाठी राबविण्यास मान्यता देण्यात आली होती. तथापि, केंद्र शासनाच्या सुचनेनुसार  ही योजना खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ या हंगामासाठी तीन वर्षाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून ३वर्षांसाठी निवड करण्यात आलेली आहे. ८५०० कोटींची पीक कर्ज वाटप

नागपूर जिल्ह्याला १४०० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले आहे. ७ ऑगस्टपर्यत ८५० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात ६०० कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. अशी माहिती विपीन इटनकर यांनी दिली.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी