शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

८० बालवाड्या बंदचा नागपूर मनपाचा घाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 10:38 IST

नागपूर मनपा शाळांची पटसंख्या वाढावी यासाठी २०१५ मध्ये सभागृहात बालवाडी, केजी-१ व केजी- २ वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पुढील शैक्षणिक सत्रात हे वर्ग बंद करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे.

ठळक मुद्देशाळांची १,२२० ने पटसंख्या घटली विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

गणेश हुड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये, आजच्या स्पर्धेच्या युगात गरीब विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, मनपा शाळांची पटसंख्या वाढावी यासाठी २०१५ मध्ये सभागृहात बालवाडी, केजी-१ व केजी- २ वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पुढील शैक्षणिक सत्रात हे वर्ग बंद करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे.आमची प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी आहे. बालवाडी चालवण्याची जबाबदारी नाही. अशी भूमिका शिक्षण विभागाने घेतली आहे. मनपाचा हा निर्णय तुघलकी व आत्मघातकी ठरणार आहे. बालवाडी व केजी-१ व केजी -२ चे वर्ग बंद केल्यास गरीब कुटुंबातील हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.२०१८-१९ च्या तुलनेत २०१९- २० या वर्षात मनपा शाळांची पटसंख्या १२२०ने घटली. तर बालवाडीतील पटसंख्या ५२२ ने वाढली आहे. मनपा शाळातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या ९,३३६ असून ९ वी ते १२ वी या वर्गात ३ हजार विद्यार्थी आहेत.

बालवाडी, केजी-१ व केजी -२ मधून पुढे हेच विद्यार्थी मनपा शाळेत प्रवेश घेतात. यातून पटसंख्या वाढीला मदत होते. असे असतानाही हे वर्ग बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे मनपाच्या अगणवाडीतील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

८० शिक्षक अतिरिक्त ठरतीलमनपा शाळांतील पटसंख्या वाढावी म्हणून अगणवाडी, केजी- १ व केजी - २ वर्ग सुरू करून यासाठी शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय सभागृहात घेण्यात आला होता. असे ८० वर्ग बंद केल्यास तितकेच शिक्षक अतिरिक्त असल्याने अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढेल.

अंगणवाडी बंद केल्यास शाळाही बंद होतीलमनपा शाळांची पटसंख्या दरवर्षी कमी होत आहे. पटसंख्या वाढीसाठी अंगणवाडी व केजी -१ व केजी- २ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण मनपा प्रशासनाने पुढील सत्रासाठी शिक्षकांची नियुक्ती केलेली नाही. आजच्या स्पर्धेच्या युगात असे वर्ग बंद केल्यास भविष्यात मनपाच्या शाळा बंद पडतील. शिक्षक अतिरिक्त ठरतील. गरीब विद्यार्थ्याचे भवितव्य धोक्यात येईल.- राजेश गवरे, अध्यक्ष, शिक्षक संघटना मनपा.

टॅग्स :Schoolशाळा