शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या वेतनासाठी आले अखेर आठ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 12:30 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी डॉक्टरांच्या वेतनासाठी मंगळवारी तातडीने आठ लाख रुपयांचे अनुदान संबंधित विभागाकडे सुपूर्द केले.

ठळक मुद्देचार महिन्यांपासून पगाराविना१३ लाखांच्या नुकसानीला जबाबदार कोण?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी डॉक्टरांच्या वेतनासाठी शासनाने १३ लाख रुपयांचे अनुदान दिले, परंतु विभागाच्या भोंगळ कारभारामुळे हे अनुदान परत गेले. परिणामी, गेल्या चार महिन्यांपासून डॉक्टर वेतनापासून वंचित होते. या संदर्भाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच याची दखल आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी घेतली. त्यांनी मंगळवारी तातडीने आठ लाख रुपयांचे अनुदान संबंधित विभागाकडे सुपूर्द केले. विशेष म्हणजे, १३ लाख रुपयांच्या नुकसानीला जबाबदार कोण, हा प्रश्न आता चर्चेला आला आहे.जिल्ह्यात ४९ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३१६ उपकेंद्र आहेत. आरोग्याचा हा डोलारा सांभाळण्यासाठी आरोग्य विभागाने कंत्राटी डॉक्टरांची मदत घेतली. ग्रामीण भागात आवश्यक सोई नसल्याने अनेक डॉक्टर येथे सेवा देण्यास इच्छुक नसतात. अशातही काही डॉक्टरांनी तयारी दर्शवली. यांच्या वेतनासाठी शासनाने मार्चच्या शेवटी १३ लाख रु. नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे पाठविले. परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, हा निधी न वापरताच परत गेला. निधी नसल्याने डॉक्टर वेतनापासून वंचित राहिले. याचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने ‘वेतनाचे पैसे आले, पण डॉक्टरांना मिळाले नाहीत’ या मथळ्याखाली १४ मे रोजी प्रसिद्ध केले. याची दखल उपसंचालक आरोग्य विभागाने घेतली. डॉ. संजय जयस्वाल यांनी तातडीने त्यांच्या अनुदानातून आठ लाख रुपये नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे सोपविले. यामुळे लवकरच डॉक्टरांच्या खात्यात वेतन जमा होणार आहे.या घटनेने मात्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सुरू असलेल्या गोंधळाचे पितळ उघडे पडले. वरिष्ठ अधिकारी कामकाजाकडे विशेष लक्ष देत नसल्याचेही समोर आले. यातच विभागाचे १३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याने प्रशासन कुणाला जबाबदार धरते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.वेतनासाठी दिला निधीउपसंचालक आरोग्य विभाग, नागपूर कार्यालयाला मिळालेल्या अनुदानातून आठ लाख रुपये कंत्राटी डॉक्टरांच्या वेतनासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे वळविण्यात आला आहे. या घटनेला घेऊन अधिकाऱ्यांना जाबही विचारण्यात आला आहे.-डॉ. संजय जयस्वाल, उपसंचालक, आरोग्य विभाग, नागपूर

टॅग्स :doctorडॉक्टर