शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांना खाऊपिऊ घालत रेल्वेने घातले ८.१३ कोटी खिशात

By नरेश डोंगरे | Updated: March 2, 2024 20:24 IST

मध्य रेल्वेची सरबराई : ११ महिन्यातच कॅटरिंग कमाईचे टार्गेट पूर्ण

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : प्रवाशांना विविध अन्नपदार्थ खाऊ घालत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने आतापर्यंत ८.१३ कोटी रुपये आपल्या तिजोरीत टाकले. विशेष म्हणजे, सुरू असलेल्या आर्थिक वर्षाचे कॅटरिंगचे टार्गेट पूर्ण होण्याच्या अवधीसाठी एक महिना शिल्लक आहे. मात्र, ११ महिन्यातच लक्ष्य पूर्ण करण्याची किमया नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी साधली आहे.

गेले आर्थिक वर्ष संपताना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने २०२३-२४ चे कॅटरिंग उत्पन्नाचे लक्ष्य ७.५० कोटी रुपये निर्धारित केले होते. ते पूर्ण करण्यासाठी रेल्वे गाड्या आणि स्थानकांवर दिल्या जाणाऱ्या कॅटरिंच्या कंत्राटावर आणि कंत्राटदारांकडून दिल्या जाणाऱ्या खाण्यापिण्याच्या सेवांवर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. खानपानाचा दर्जा सुधारण्यासोबतच विविध रेल्वेस्थानक तसेच गाड्यांमध्ये अनधिकृत वेंडर्सचा असणारा धुमाकुळही थांबविला. विभागातील प्रमूख रेल्वे स्थानकांवर अचानक तपासणीची मोहिम राबवून अनधिकृत खाद्य पदार्थ, पाणी, ज्यूससह अन्य चिजवस्तू विकणारांवर कारवाईचा सपाटा लावला होता. खाद्यपदार्थ विकणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांना स्वच्छता आणि दर्जा राखण्यासाठीही वारंवार सूचना, आदेश दिले जात होते. त्याचेच चांगले परिणाम समोर आले असून, निर्धारित केलेले उद्दीष्ट पूर्ण होण्याच्या एक महिन्यापूर्वीच कॅटरिंग उत्पन्नाचे लक्ष्य नागपूर विभागाने साधले. मार्च २०२४ पर्यंत ७ कोटी, ५० लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा असताना २९ फेब्रुवारीपर्यंत विभागाने ८ कोटी १३ लाखांचे उत्पन्न मिळवले.टार्गेट पेक्षा १८ टक्के जास्त

नागपूर विभागाने मिळवलेले हे उत्पन्न सुरू असलेल्या आर्थिक वर्षाच्या निर्धारित केलेल्या टार्गेटपेक्षा १८ टक्के जास्त आहे. या यशाचे श्रेय कॅटरिंग विभागाचे नियोजन करणाऱ्या आणि वेळोवेळी त्या संबंधाने आवश्यक कारवाई करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना जाते, अशी प्रतिक्रिया या निमित्ताने रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल आणि वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी नोंदविली आहे. खानपानाचा दर्जा उंचावल्यामुळेच प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे