शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ७९ डॉक्टरांची कोरोनावर मात; ६२ डॉक्टर उपचाराखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 12:10 IST

आतापर्यंत मेडिकलच्या १४१ निवासी व इन्टर्न डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ७९ डॉक्टरांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात के ली आहे. हे डॉक्टर पुन्हा आपले कर्तव्य बजावण्यासाठी रुग्णसेवेत दाखल झाले आहेत तर ६२ डॉक्टर अजूनही उपचाराखाली आहेत.

ठळक मुद्दे१४१ निवासी, इन्टर्न डॉक्टर बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीत खऱ्या अर्थाने निवासी डॉक्टर लढवय्यांसारखे काम करीत आहेत. अहोरात्र सेवा करत घरापासून लांब राहत कर्तव्य बजावत आहे. निवासी डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून इन्टर्न डॉक्टरही कोरोना कक्षात राबत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या सतत संपर्कात येत असल्याने आतापर्यंत मेडिकलच्या १४१ निवासी व इन्टर्न डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ७९ डॉक्टरांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात के ली आहे. हे डॉक्टर पुन्हा आपले कर्तव्य बजावण्यासाठी रुग्णसेवेत दाखल झाले आहेत तर ६२ डॉक्टर अजूनही उपचाराखाली आहेत.नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून रोज १५०० ते २००० रुग्णांची नोंद होत आहे. खासगी रुग्णालयांतील सेवा सामान्य व गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेर असल्याने अशा रुग्णांसाठी मेयो, मेडिकल आशेचे केंद्र ठरले आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी संपादन करणारे निवासी डॉक्टर तर एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण करून एक वर्ष रुग्णसेवा देणारे इन्टर्न डॉक्टर हे विभागप्रमुखांसह वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात रुग्णांना सेवा देत आहेत. मेडिकलमध्ये ५५० निवासी तर २०० इन्टर्न डॉक्टर इमानेइतबारे डॉक्टर सैनिकांची भूमिका बजावत आहे. मेडिकलमधील निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. तरुण प्रसाद यांनी ‘लोकमत’ला सांगितले, एका निवासी डॉक्टरला आठ तास ड्युटी करावी लागते. वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाबाधितांचा वॉर्ड निवासी डॉक्टरांसाठी हॉटस्पॉट झाला आहे. तरी निवासी डॉक्टर स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा देत आहेत. जे निवासी डॉक्टर कोरोनाची बाधा होऊन बरे झाले ते पुन्हा ड्युटीवर रुजू झाले आहेत.मे महिन्यापासून प्रोत्साहनपर भत्त्याची प्रतीक्षानिवासी डॉक्टर फ्रंटलाईनवर काम करत आहेत. डॉक्टरांना शारीरिक ताणासह मानसिक ताणाशी दोन हात करावे लागत आहेत. परंतु शासनाला याचा विसर पडल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, कोरोना कक्षात काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांना प्रोत्साहन म्हणून मे महिन्यापासून दरमाह १० हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु आता सप्टेंबर संपायला आला असताना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही. शासनाने नुकत्याच काढलेल्या एका परिपत्रकात गेल्या चार महिन्यांचा प्रोत्साहनपर भत्ता ऑगस्ट महिन्याच्या विद्यावेतनात दिला जाईल, असे स्पष्ट केले होते. परंतु १० तारखेपर्यंत होणारे विद्यावेतन १८ सप्टेंबरची तारीख उजाडूनही मिळालेले नाही.डॉ. तरुण प्रसादअध्यक्ष, मार्ड मेडिकल

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस