शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पाळणा हलला तरी मिळेनात लग्नाचे पैसे; दोन वर्षे प्रतीक्षाच!

By गणेश हुड | Updated: May 15, 2023 18:31 IST

Nagpur News आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना समाजकल्याण विभागाकडून ५० हजार रुपये अनुदान दिले जाते. मात्र, नागपूर जिल्हयात जोडप्यांना मागील दोन वर्षात पैसे मिळालेले नाही.

गणेश हूड नागपूर : आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना समाजकल्याण विभागाकडून ५० हजार रुपये अनुदान दिले जाते. मात्र, नागपूर जिल्हयात जोडप्यांना मागील दोन वर्षात पैसे मिळालेले नाही. पैसे कधी मिळणार हेही स्पष्ट नसल्याने अर्जधारक जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात हेलपाटे मारत आहेत.  

२०२१ पासून निधीची कमतरता आहे. त्यामुळे प्रकरणे प्रलंबित आहे. यातील अनेकांचे पाळणे हलले. मात्र, त्यांना अद्याप हे अनुदान मिळालेले नाही.राज्य सरकारकडून दरवर्षी अनुदान प्राप्त होणे अपेक्षित आहे. परंतु  निधी मिळत नसल्याने लाभार्थी जोडप्यांना पैशासाठी समाजकल्याण कार्यालयाच्या  चकरा मारावया लागतात. सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यत पोहचावा, त्याचा लाभ लाभार्थींना होणे गरजेचे आहे. लाभार्थी जोडप्यांची गैरसोय टाळण्यासाठी समाज कल्याण कार्यालयाने याबाबतची माहिती जाहीर करणे आवश्यक आहे. निधी कधी मिळणार हे स्पष्ट असले तर  लाभार्थींना  विनाकारण चकरा माराव्या लागणार नाही. ३ कोटी  ७५ लाखांची गरज नागपूर  जिल्ह्यातील ७७५ प्रकरणांचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. यापूर्वी अखेरचे अनुदान सप्टेंबर २०२२ मध्ये ५६ लाख रुपये प्राप्त झाले होते. त्यातून २६ ऑक्टोबर २०२० पर्यंतच्या ११३ लाभार्थ्यांना अनुदान दिले गेले. २७ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२३ या अडीच वर्षांतील ७७५   प्रकरणे प्रलंबित आहे.यासाठी ३ कोटी ७५ लाखांच्या अनुदानाची प्रतिक्षा आहे. 

टॅग्स :Governmentसरकार