लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदेशातून आलेल्या एका विद्यार्थिनीला कॉटन मार्केटमधील एका हॉटेलात क्वारंटाईन करण्यात आले. सात दिवस क्वारंटाईन राहिल्यावर तिच्याकडून ७७ हजार रुपयांचे शुल्क आकारण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.विदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना विशेष अभियानांतर्गत परत आणले जात आहे. देशात आल्यानंतर आपल्या शहरात पोहोचणाऱ्या लोकांना हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन ठेवले जात आहे. किर्गीस्तान येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या अयोध्यानगरातील एक विद्यार्थिनी नुकतीच मुंबईत आल्यावर रस्ते मार्गाने नागपुरात पोहोचली. विद्यार्थिनीची आई ज्योती किरनारकर यांनी सांगितले की, कॉटन मार्केट येथील एका हॉटेलमध्ये मुलीला ७ दिवस क्वारंटाईन राहिल्यावर ७७ हजार रुपये शुल्क आकारण्यात आले. मुलगी परत येईल तेव्हा तिला क्वारंटाईन केले जाईल, याची माहिती होती. परंतु त्यासाठी इतके शुल्क आकारले जाईल, याची मात्र कल्पनाही नव्हती. आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातील आहोत. मुलीच्या शिक्षणासाठी खर्च करीत आहोत. परंतु क्वारंटाईन करण्याच्या मोबदल्यात इतका खर्च बरोबर नाही.
सात दिवसाच्या क्वारंटाईनसाठी ७७ हजार रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 00:16 IST