शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रा  बँक योजने अंतर्गत नागपूर जिल्ह्यात ७६९ कोटी कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 20:27 IST

मुद्रा  बँक योजनेच्या माध्यमातून विविध व्यवसायासाठी शिशु, किशोर व तरुण योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लक्ष ६३ हजार ५६६ अर्जदारांना विविध व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी ७५९ कोटी ७ लक्ष रुपये विविध बँकाद्वारे मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील उद्योग सुरू करणाऱ्या अर्जदारांनी मुद्र्रा बँक योजनेंतर्गत प्रलंबित असलेले अर्ज एक महिन्याच्या आत निकाली काढावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिल्यात.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी सचिन कुर्वे : १ लक्ष ६३ हजार अर्जदारांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुद्रा  बँक योजनेच्या माध्यमातून विविध व्यवसायासाठी शिशु, किशोर व तरुण योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लक्ष ६३ हजार ५६६ अर्जदारांना विविध व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी ७५९ कोटी ७ लक्ष रुपये विविध बँकाद्वारे मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील उद्योग सुरू करणाऱ्या अर्जदारांनी मुद्र्रा बँक योजनेंतर्गत प्रलंबित असलेले अर्ज एक महिन्याच्या आत निकाली काढावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिल्यात.मुद्र्रा बँक योजनेच्या जिल्हा समन्वय समितीची बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी विविध बँकांनी मुद्रा बँक योजनेंतर्गत केलेल्या कर्ज पुरवठ्याचा आढावा घेतला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते.यावेळी आमदार प्रा. अनिल सोले, मुद्रा बँक योजना समितीचे सदस्य सचिव कृष्णा फिरके,डिक्कीचे निश्चय शेळके, लिड बँक व्यवस्थापक अयुब खान, श्रीराम बांधे उपस्थित होते.मुद्रा बँक योजनेची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी व जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रथम स्वतंत्र सेल तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शिशु योजनेमध्ये १ लाख ५१ हजार ८४७ नागरिकांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून सरासरी ३३ टक्के नागरिकांना नियमितपणे कर्जाची वसुली होत आहे. मागील वर्षी ८६४ कोटी रुपयाचे वाटप करण्यात आले होते. यावर्षी सुध्दा चांगले काम करावे, असेही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले.२२ पासून युथ एम्पॉवरमेंट समिटमुद्रा बँक कर्ज योजनेंतर्गत शिशु, किशोर व तरुण योजनेसोबत स्टॅन्डअप व स्टार्टअप या योजनेमध्ये युवकांना सहज व सुलभ कर्ज पुरवठा करण्यासाठी विविध बँकांनी युवकांसाठी कर्जमेळावे आयोजित करावे, अशी सूचना आमदार प्रा. अनिल सोले यांनी यावेळी केली. फार्च्यून फाऊंडेशनतर्फे येत्या २२ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात युथ एम्पॉवरमेंट समिट आयोजित करण्यात आली आहे. येथे किमान एक लाख युवक उपस्थित राहणार असून त्यांना मुद्रा बँक योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांनी आपले स्टॉल लावून युवकांना मुद्रा बँक योजने संदर्भात मार्गदर्शन करावे, अशी सूचना बँकेच्या अधिकाऱ्यांना केली.

टॅग्स :bankबँकcollectorतहसीलदार