शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

बियाण्यांचे ७६६ नमुने अपात्र

By admin | Updated: June 28, 2016 02:33 IST

कृषी उत्पादन वाढीमध्ये बियाण्यांची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे बियाणे गुणवत्तापूर्वक असणे आवश्यक असते.

नागपूर : कृषी उत्पादन वाढीमध्ये बियाण्यांची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे बियाणे गुणवत्तापूर्वक असणे आवश्यक असते. पेरणीनंतर बियाण्यांची उगवण व्यवस्थित झाली नाही तर शेतकऱ्याला फार मोठे नुकसान होते. त्यामुळे बियाणे उत्पादक व पुरवठादार यांना बियाणे कायदा-१९६६ नुसार गुणवत्तापूर्वक बियाणे पुरवठा करणे बंधनकारक ठरते. अशा बियाणे उत्पादकांना बीज परीक्षण प्रयोगशाळेत आपल्या बियाण्यांची तपासणी करून घ्यावी लागते. यासाठी विदर्भात केवळ नागपुरात बीज परीक्षण प्रयोगशाळा असून, या अंतर्गत ११ जिल्ह्यांचा समावेश आहे. येथे तीन प्रकारच्या बियाणे नमुन्यांची तपासणी केल्या जाते. त्यानुसार या प्रयोगशाळेत मागील वर्षभरात एकूण १८ हजार १३८ बियाणे नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ७६६ नमुने अपात्र ठरले आहेत. यापैकी ६,२७८ नमुने कृषी विभागातील गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी गोळा करून त्यापैकी तब्बल १०७ नमुने अपात्र ठरले आहेत. अनेकदा या बीज परीक्षणाची गरज काय? असा शेतकरी प्रश्न उपस्थित करतात. मात्र जाणकारांच्या मते, जोपर्यंत बियाण्याची उगवण क्षमता माहीत होत नाही, तोपर्यंत प्रति एकर किती बियाणे पेरावे याचा अंदाज लावता येत नाही. शिवाय या तपासणीतून विक्रेते आणि शेतकरी यांना बियाण्यांची उगवण क्षमता, भौतिक शुद्घता, कीडग्रस्त प्रमाण आणि ओडीव्ही याचीही अचूक माहिती मिळते. त्यामुळे प्रत्येक बियाण्याची प्रयोगशाळेतून तपासणी करून घेणे अनिवार्य ठरते. मागील वर्षी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण बियाण्यांपैकी ४.२२ टक्के बियाणे अपात्र ठरले होते. या उपरोक्त ते बियाणे छुप्या मार्गाने बाजारातून शेतकऱ्यांना विक्री केले जाऊ शकते, अशी बीज परीक्षण अधिकाऱ्यांनी शंका उपस्थित केली आहे, तरी शेतकऱ्यांनी अशा बियाण्यांपासून सावध राहिले पाहिजे. उपलब्ध आकडेवारीनुसार मागील १ एप्रिल २०१६ ते १५ मे २०१६ दरम्यान एकूण १०९ नमुने तपासण्यात आले आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, यापैकी एकही नमुना अपात्र ठरलेला नाही. (प्रतिनिधी)