शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

सिकलसेलच्या ७६ टक्के

By admin | Updated: October 24, 2016 02:54 IST

गडचिरोली जिल्ह्यातील माडिया गोंड समाजातील सिकलसेलच्या ७६ टक्के रुग्णांमध्ये ‘व्हिटॅमिन डी’ची कमी असते.

रुग्णांत ‘व्हिटॅमिन डी’ची कमी संजना जयस्वाल यांच्या संशोधनातील निष्कर्षनागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील माडिया गोंड समाजातील सिकलसेलच्या ७६ टक्के रुग्णांमध्ये ‘व्हिटॅमिन डी’ची कमी असते. यात ६३ टक्के मुली तर ३७ टक्के मुलांची संख्या असल्याचा निष्कर्ष मेयोच्या एमबीबीएस अंतिम वर्षाची विद्यार्थिनी संजना संजय जयस्वाल हिने काढला आहे. यासंदर्भातील संशोधन अकॅडमी फॉर सिकलसेल अ‍ॅण्ड थॅलेसिमियाच्या १० व्या वर्धापना दिनाच्या दरम्यान रॉयल कॉलेज आॅफ फिजिशियन लंडन येथे सादर करण्यात आले. २७ देशांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. यात महाराष्ट्रातून संजना ही एकमात्र विद्यार्थिनी ठरली, जिचा उत्कृष्ट १५मध्ये समावेश करण्यात आला. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यात सिकलसेल रुग्णांवरील अभ्यासासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (डीएमईआर) आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने संजना हिने गडचिरोली जिल्ह्यात राहून संबंधित विषयावर शोध केला. त्यांनी रुग्णांमधील व्हिटॅमिन डीच्या अभ्यासासाठी विविध प्रकारच्या चाचण्या केल्या. राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेच्या संचालकपदी नुकतेच रुजू झालेले डॉ. संजय जयस्वाल यांची मुलगी संजना हिने शोधामध्ये ५ ते १८ वयोगटातील सिकलसेलबाधित २१० रुग्णांचा अभ्यास केला. या अभ्यासातून लंडन येथे सादर करण्यात आलेल्या शोधनिबंधाला घेऊन वरिष्ठ चिकित्सकांनी यात आणखी संशोधनाचा सल्ला दिला. डिसेंबर महिन्यात अकॅडमीच्यावतीने आवश्यक सूचना प्राप्त होणार असून त्यानुसार संजना काम करेल, अशी माहिती डॉ. जयस्वाल यांनी दिली. तिरंग्याच्या रंगात निबंधभारताच्या ध्वजाच्या रंगात संजनाने हा शोध निबंध सादर केला. संजना म्हणाली, भारताकडून हा शोधनिबंध सादर करणे माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. म्हणूनच हा निबंध देशाच्या ध्वजाच्या रंगात तयार केला. २७ देशाच्या प्रतिनिधींमधून केवळ १५ प्रतिनिधींचे शोध निबंध सादर करण्यात आले. त्यात हा सन्मान मिळाला.