शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ७५ हजार नागरिकांना टॅक्सची डिमांड नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 23:29 IST

७५ हजार मालमत्ताधारकांचा ठावठिकाणा नसल्याने या मालमत्ताधारकांना डिमांड वाटप रखडले आहे. याचा महापालिकेच्या कर वसुलीवर परिणाम झाला आहे.

ठळक मुद्देपत्ता मिळत नसल्याने कर वसुलीत अडचण : सॉफ्टवेअरमधील नोंदी व इंडेक्समध्ये तफावत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मालमत्ता कराची वसुली वाढावी यासाठी शहरातील मालमत्तांचा सायबर टेक कंपनीच्या माध्यमातून सर्वे करण्यात आला. यात नवीन मालमत्तांचा शोध घेण्यात आला. मालमत्तांची संख्या ५ लाख ५० हजारांवरुन ६ लाख ७५ हजारांवर पोहचली. सायबर टेट कंपनीने सॉफ्टवेअरमध्ये याची नोंद केली. परंतु यातील ७५ हजार मालमत्ताधारकांचा ठावठिकाणा नसल्याने या मालमत्ताधारकांना डिमांड वाटप रखडले आहे. याचा महापालिकेच्या कर वसुलीवर परिणाम झाला आहे.सायबर टेक कंपनीने महापालिकेच्या रेकॉर्डनुसार शहरातील मालमत्तांचा सर्वे केला. या दरम्यान नवीन मालमत्ताही आढळून आल्यात. मालमत्तांची संख्या वाढल्याने कर वसुलीत वाढ होईल अशी अपेक्षा होती. परंतु सायबर टेक कंपनीच्या सर्वेत त्रुटी होत्या. त्यामुळे महापालिकेच्या सॉफ्टवेअरमध्ये करण्यात आलेल्या नोंदी व इंडेक्स क्रमांक जुळत नाही. मालमत्ताधारकांचा पत्ता माहिती नाही. मालमत्ताधारक ही स्वत:हून कर आकारण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे कर आकारणी करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. याचा वसुलीवर परिणाम होत असल्याची माहिती मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आली.७५ हजार मालमत्ताधारकांचा शोध घेण्यासाठी झोन स्तरावरील निरीक्षकांना ही यादी पाठविण्यात आली आहे. सर्वे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मालमत्ताधारकांनी महिती न दिल्याने या मालमत्तांना अद्याप इंडेक्स क्रमांक मिळालेला नाही. त्यामुळे कर आकारणी करता आलेली नाही. परिणामी डिमांड वाटप करता आलेले नाही. डिमांड वाटपासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी दिले.मागील सहा वर्षांचा कर आकारणारसर्वेसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मालमत्ताधारकांनी मालकी हक्काची कागदपत्रे वा आवश्यक माहिती सादर न केल्याने ७५ हजार मालमत्ताधारकांना डिमांड पाठविण्यात आलेल्या नाही. मालमत्ताधारक कर आकारणीसाठी पुढे येत नसल्यास महापालिका नियमानुसार नवीन कर आकारणी करताना मागील पाच वर्षांच्या थकबाकीसह कर आकारला जाणार आहे.मालमत्ता मनपाच्या नावे करणारमालमत्तावर कर आकारणी करून घेण्याची जबाबदारी मालमत्ताधारकांची आहे. परंतु यासाठी मालमत्ताधारक पुढे येत नसल्यास अशा भूखंडावर महापालिकेच्या नावाचा फलक लावला जाईल. त्यानंतर कर न भरल्यास भूखंड महापालिकेच्या नावावर केले जातील.अशी माहिती मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर