शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

५० दिवसांतच पतीला सोडणाऱ्या पत्नीस ७,५०० रुपये खावटी; उच्च न्यायालयाने वादग्रस्त आदेश बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 06:10 IST

उच्च न्यायालयाचा निर्णय : शारीरिक छळाचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्नानंतर केवळ ५० दिवसांमध्ये पतीला सोडून माहेरी निघून गेलेल्या पत्नीस मासिक सात हजार ५०० रुपये अंतरिम खावटी मंजूर करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय जोशी यांनी हा निर्णय दिला.

प्रकरणातील पत्नी नागपूर तर, पती पुणे येथील रहिवासी आहे. ९ फेब्रुवारी २०२२ रोजी नागपूर कुटुंब न्यायालयाने पत्नीला मासिक १० हजार रुपये अंतरिम खावटी मंजूर केली होती. त्याविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील पुरावे व सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय लक्षात घेता कुटुंब न्यायालयाच्या वादग्रस्त आदेशात बदल केला व खावटीमध्ये समतोल साधून पत्नीस मासिक ७ हजार ५०० रुपये मंजूर केले. या दाम्पत्याचे ९ नोव्हेंबर २०१९ रोजी लग्न झाले होते. 

..असे होते पत्नीचे म्हणणेपती व सासरची मंडळी लग्न झाल्यापासूनच हुंड्यासाठी शारीरिक-मानसिक छळ करीत होते. त्यामुळे माहेरी जावे लागले. सध्या पालकांच्या आधारावर जीवन जगत आहे. उत्पन्नाचा काहीच स्त्रोत नाही. पती खासगी कंपनीत कार्यरत असून, त्याला वार्षिक १३ लाख ३२ हजार रुपये वेतन मिळते, असे पत्नीचे म्हणणे होते.

पतीने आरोप अमान्य केलेपतीने पत्नीचे सर्व आरोप अमान्य केले. पती पालनपोषण करीत नाही, यासह इतर सर्व आरोप खोटे आहेत. पती सध्या एका खासगी कंपनीत ३० हजार रुपये मासिक वेतनाने काम करीत आहे. पत्नी लघुचित्रपट, शिकवणी वर्ग, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व बँक एजन्ट म्हणून पैसे कमविते, असे न्यायालयाला सांगण्यात आले.

टॅग्स :Courtन्यायालय