शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

पोषणघटकांच्या कमतरतेमुळे ७५ टक्के बालकांचा मृत्यू

By admin | Updated: March 4, 2017 21:53 IST

मुलांच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये पुरेशा सूक्ष्मघटकांचे सेवन अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, या पोषणघटकांच्या कमतरतेमुळे ७५ टक्के मृत्यू होतात

ऑनलाइन लोकमत 
नागपूर, दि. 4 -  मुलांच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये पुरेशा सूक्ष्मघटकांचे सेवन अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, या पोषणघटकांच्या कमतरतेमुळे ७५ टक्के मृत्यू होतात आणि या गंभीर आकडेवारीत भरच पडत असल्याचा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (एमओएचएफडब्ल्यू) आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. 
६ ते २४ महिन्यांच्या वयोगटात बालकांच्या वाढीमधील घट आणि संसर्ग यांचा धोका अधिक प्रमाणात असतो. त्यामुळे बालकांची योग्य वाढ आणि विकासासाठी आहारात पुरेशा प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजांची भूमिका अत्यंत महत्त्वाचे असते, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय मराठे यांनी पत्रकारांना दिली. 
डॉ. मराठे म्हणाले, बालकांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यात भारतात मोठ्या प्रमाणावर काम होत आहे. मात्र, तरीही दरवर्षी लाखो मुले पाचव्या वाढदिवसापूर्वीच जीवनसत्व आणि खनिजांच्या अभावाला बळी पडतात बालकांमधील मृत्यू आणि अपंगत्व यामागील हे एक मुख्य कारण ठरत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या (एमओएचएफडब्ल्यू) अहवालानुसार दरवर्षी जन्मलेल्या २६ दशलक्ष बालकांपैकी ७ लाखांपेक्षा अधिक मुले नवजात अवस्थेतूनही पुढे जात नाहीत. 
देशातील १३ टक्के लोकसंख्या सहा वर्षांखालील मुलांची आहे आणि दररोज त्यातील १२.७ लाख मुले अपुºया पोषक घटकांमुळे मरण पावतात. मुलांच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये पुरेशा जीवनसत्व आणि खनिजांच्या सूक्ष्मघटकांचे सेवन अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, या पोषणघटकांच्या कमतरतेमुळे ७५ टक्के मृत्यू होतात. पाच वर्षांखालील बालकांमध्ये मृत्यूची प्रमुख कारण कुपोषण हेच आहे. 
बाळाचे पहिले हजार दिवस महत्त्वाचे 
बालकांच्या आयुष्यातील पहिले १००० दिवस त्यांच्या नंतरच्या आयुष्यासाठीचा पाया रचतात. त्याच्या आरोग्याची रचना करतात, त्याला आकार देतात. या कालावधीत पोषक घटकांनी युक्त आहाराचे सेवन अत्यंत महत्त्वाचे ठरते. कारण यामुळेच शारीरिक वाढ, शिकण्याची क्षमता यांच्याबाबत मुलांची क्षमता वाढते. 
सहा महिन्यानंतर कुपोषणाचा धोका असतो 
बालकाच्या वयाच्या सहा महिन्यांनंतर कुपोषणाचा मोठा धोका असतो. कारण, सहा महिन्यानंतर बाळाला केवळ स्तनपान न देता बाहेरचे अन्नपदार्थ देण्यास सुरुवात होते. याच टप्प्यात पोषक घटक देण्यातील तफावत सर्वाधिक जाणवते. कारण, या टप्प्यावर मुलांच्या गरजा वाढलेल्या असतात आणि स्तनपान कमी होते.