शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

७.३१ लाख डिमांड वाटपाचे मनपाच्या मालमत्ता विभागापुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 19:43 IST

महापालिकेच्या कर आकारणी व करवसुली विभागाला २०२०-२१ या वर्षातील डिमांड वाटप मार्च मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. मात्र लॉकडाऊनमुळे कामकाज ठप्प असल्याने डिमांड छपाईला विलंब होत आहे. अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ७ लाख ३१ हजार ४२१ डिमांड वाटप करण्याचे आव्हान विभागापुढे उभे ठाकले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या कर आकारणी व करवसुली विभागाला २०२०-२१ या वर्षातील डिमांड वाटप मार्च मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. मात्र लॉकडाऊनमुळे कामकाज ठप्प असल्याने डिमांड छपाईला विलंब होत आहे. अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ७ लाख ३१ हजार ४२१ डिमांड वाटप करण्याचे आव्हान विभागापुढे उभे ठाकले आहे.लॉकडाऊन संपताच महापालिकेच्या १० झोनमध्ये डिमांड वाटपाला सुरुवात केली जाणार आहे. वास्तविक मे पूर्वी कर भरणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ४ टक्के सवलत दिली जाते. परंतु यावर्षी अद्याप डिमांड वाटप करण्यात आलेले नाही. वित्त वर्षात ७,३१,४२१ मालमत्ताधारकांकडून २६१.६० कोटींची करवसुली केली जाणार आहे. पहिल्या सहामाहीत कर न भरल्यास २ टक्के शास्ती आकारली जाते. परंतु या वर्षात डिमांड वाटप झालेले नाही. त्यामुळे शास्ती आकारली जाणार नाही. डिमांड मिळाल्यानंतर डिसेंबरपूर्वी कर भरणाऱ्यांना ४ टक्के सवलत दिली जाणार आहे.गेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता करापासून स्थायी समितीने ५५१ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. प्रत्यक्षात २४५ कोटी जमा झाले. लॉकडाऊनचाही काही प्रमाणात वसुलीला फटका बसला. नाहीतर हा आकडा २६५ ते २७० कोटी पर्यंत गेला असता. मागील वित्त वर्षात २३३.७३ कोटींच्या चालू वसुलीपैकी १२३.२८ कोटींची वसुली झाली. तर १२२ कोटींची थकबाकी वसूल करण्यात आली. गेल्या वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुकीचाही करवसुलीवर परिणाम झाला. विभागातील कर्मचारी दोन महिने निवडणुकीच्या कामात व्यस्त होते.वित्त वर्षात मनपा आयुक्तांच्या अर्थसंकल्पात मालमत्ता करापासून २८९.४४ कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात हा आकडा ४५० कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. थकबाकी व नियमित वसुली विचारात घेता दिलेले उद्दिष्ट अवघड नाही.डिसेंबरपर्यंत शास्ती नाहीलॉकडाऊनमुळे डिमांड वाटपाला विलंब होत आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत मालमत्ताधारकांना शास्ती लावली जाणार नाही. लॉकडाऊन संपताच डिमांड वाटप व करवसुलीच्या कामाला गती येईल, असा विश्वास मनपाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर