शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मराठी-इंग्रजीतील ७२ हजारावर पर्यायी शब्दांचा ‘शासन शब्दकोश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:28 IST

शासकीय कार्यालयांमधील मराठी भाषेचा जास्तीतजास्त वापर व्हावा, या उद्देशाने भाषा संचालनालयाने पुढाकार घेत राजभाषा मराठीतील पर्यायी इंग्रजी शब्दांचा शासन शब्दकोशाचा मोबाईल अ‍ॅप तयार केला आहे. शासन शब्दकोश भाग-एक असे या मोबाईल अ‍ॅपला नाव देण्यात आले असून, यात निवडक शब्दकोशातील ७२,१७१ पर्यायी शब्दांचा समावेश आहे.

ठळक मुद्देमोबाईल अ‍ॅप : भाषा संचालनालयाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासकीय कार्यालयांमधील मराठी भाषेचा जास्तीतजास्त वापर व्हावा, या उद्देशाने भाषा संचालनालयाने पुढाकार घेत राजभाषा मराठीतील पर्यायी इंग्रजी शब्दांचा शासन शब्दकोशाचा मोबाईल अ‍ॅप तयार केला आहे. शासन शब्दकोश भाग-एक असे या मोबाईल अ‍ॅपला नाव देण्यात आले असून, यात निवडक शब्दकोशातील ७२,१७१ पर्यायी शब्दांचा समावेश आहे.हा शब्दकोश तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे भाषा संचालनालयाचे विभागीय सहायक संचालक हरेश सूर्यवंशी यांनी याबाबतची माहिती बुधवारी माहिती कार्यालयाच्या माध्यम संवाद या कार्यक्रमात दिली. सूर्यवंशी यांनी सांगतले की, या शासन शब्दकोश मोबाईल अ‍ॅपचे लोकार्पण मराठी भाषा गौरवदिनी करण्यात आले. यात भाषा संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या शब्दकोशापैकी शासन व्यवहार कोश, प्रशासन वाक्यप्रयोग, न्यायव्यवहार कोश व कार्यदक्षिका हे चार निवडक शब्दकोश व न्यायव्यवहारात वापरण्यात येणाऱ्या इंग्रजी शब्दांना मराठीत अर्थ व पर्याय आणि मराठी शब्दांना इंग्रजीत अर्थ व पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या मोबाईल अ‍ॅपची रचना अत्यंत सहज व सुलभ आहे. हा मोबाईल अ‍ॅप शासनाच्या वेबसाईटवर जाऊन डाऊनलोड करता येतो.या शब्दकोशात सध्या ७२,१७१ पर्यायी शब्दांचा अर्थ व पर्याय उपलब्ध आहे, कालांतराने त्यात आणखी वाढ होईल, असा विश्वासही सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माहिती संचालक राधाकृष्ण मुळी व जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते. केंद्र व राज्य सरकारचे अधिनियमही उपलब्धया मोबाईल अ‍ॅपमध्ये राज्य व केंद्र शासनाचे अधिनियमसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सध्या ७५० शासकीय अधिनियम उपलब्ध आहेत. या अधिनियमाची पीडीएफ स्वरूपातील मराठी प्रत उपलब्ध आहे ती डाऊनलोडसुद्धा करता येऊ शकते.

टॅग्स :marathiमराठीenglishइंग्रजी