शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

राज्यात ६ वर्षांत ७२४ शिकारी; मात्र गुन्हे नोंदविले गेले फक्त २२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 07:32 IST

Nagpur News forest wild life वन विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात २०१५ ते नोव्हेंबर- २०२० पर्यंत या सहा वर्षांच्या काळात वाघ, बिबट आणि रानगवा, चितळ, सांबर यांसह अन्य वन्यप्राण्यांच्या मिळून ७२४ शिकारीच्या घटना घडल्याची नोंद आहे. यातील फक्त २२ प्रकरणांतील शिकारींचे गुन्हे नोंद असून काही न्यायप्रविष्ट आहेत.

ठळक मुद्देवन्यजीव अपराध नियंत्रण ब्यूरोअभावी अनेक प्रकरणांचा तपास अडला२०१४ मध्ये निर्णय होऊनही राज्यात स्थापनाच नाही

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : वन विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात २०१५ ते नोव्हेंबर- २०२० पर्यंत या सहा वर्षांच्या काळात वाघ, बिबट आणि रानगवा, चितळ, सांबर यांसह अन्य वन्यप्राण्यांच्या मिळून ७२४ शिकारीच्या घटना घडल्याची नोंद आहे. यातील फक्त २२ प्रकरणांतील शिकारींचे गुन्हे नोंद असून काही न्यायप्रविष्ट आहेत. या सहा वर्षात वाघांच्या शिकारीचे फक्त ५, तर बिबट्यांच्या शिकारीचे फक्त १७ गुन्हे नोंद आहेत. या स्थितीवरून वन्यजीव अपराध नियंत्रण ब्यूरोची गरज अधोरेखित होते.

वन्यजीवांच्या शिकारीच्या घटना, अवयवांची तस्करी, आंतरराष्ट्रीय टोळ्यांशी असलेले संबंध यावर राज्यस्तरावर प्रभावी नियंत्रणासाठी वन्यजीव अपराध नियंत्रण ब्यूरो स्थापन करण्याचे सहा वर्षांपूर्वी आदेश मिळूनही राज्यातील वन विभाग मात्र उदासीन आहे. या काळात वन विभागाने ब्यूरोच्या स्थापनेसाठी साधा प्रस्तावही दिला नाही. यावरून ही उदासीनता स्पष्ट होत आहे. पांढरकवडा येथील जंगलात अलीकडेच गर्भवती वाघिणीच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर हा विषय चिंतेचा ठरला आहे.

केंद्रीय पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालयाने १४ नोव्हेंबर २०१४ ला देशातील सर्व राज्यांना वन्यजीव अपराध नियंत्रण ब्यूरोची स्थापना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. देशात फक्त मिझोराम वगळता याची अंमलबजावणी कोणत्याही राज्याने केली नाही. ब्यूरोची स्थापनाच नसल्याने राज्यभर वन्यप्राण्यांच्या शिकारीमध्ये आणि अवयवांच्या तस्करीमध्ये वाढ झाली आहे. नियंत्रण नसल्याने यातील अनेक प्रकरणांचा तपासच लागलेला नाही.

पोलीस - वन विभागाची सांगडच नाही

भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम - १९७२ नुसार, देशातील सर्व वन्यजीवांना सुरक्षा प्रदान करण्याची तरतूद आहे. असे असले तरी शिकारी टोळ्यांचा वावर, त्यांना कायद्याची नसलेली भीती, गुन्ह्यांची वाढती संख्या यामुळे प्रभावी नियंत्रणाची गरज व्यक्त होत आहे. वन विभाग आणि पोलिसांची स्वतंत्र यंत्रणा राज्यात आहे. मात्र वन गुन्हे घडल्यावर एकत्रितपणे तपासासाठी सांगड नाही. यामुळे तपास कामात बरेच अडथळे येतात. आरोपींना पसार होण्याची संधी मिळते.

६ वर्षांतील शिकारीच्या घटना...

वर्ष - वाघ - बिबट - अन्य वन्यप्राणी

२०१५ - १३ - ६६ - माहिती उपलब्ध नाही

२०१६ - १४ - ८९ - माहिती उपलब्ध नाही

२०१७ - २२ - ८६ - माहिती उपलब्ध नाही

२०१८ - १९ - ८८ - माहिती उपलब्ध नाही

२०१९ - १७ - ११० - खवले मांजर १, रानगवा १, घोरपड ४, कासव ३, अजगर २, उदमांजर १

२०२० (नोव्हेंबरपर्यंत) - १७ - १७२ - माहिती उपलब्ध नाही

एकूण - १०३ - ६११ - १२

(स्थलांतरित पक्षी, मोर, हरियल, तितर, बटेर यांसह अन्य पक्ष्यांच्या शिकारीकडे दुर्लक्ष असल्याने नोंद नाही.)

महाराष्ट्र राज्य वनसंपदेत संपन्न आहे. ६ व्याघ्र प्रकल्प, ६ राष्ट्रीय वन उद्याने, ५० पेक्षा अधिक अभयारण्ये, मोठ्या प्रमाणावर जैवविविधता, वाघांची संख्या अधिक... असे असले तरी प्राणी धोक्यात आहेत. वन विभागाचा ब्यूरोच्या स्थापनेसाठी हवा तसा पुढाकार दिसत नाही. हा विषय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणला आहे.

- यादवराव तरटे पाटील, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ

...

टॅग्स :leopardबिबट्याforestजंगल