शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील वैद्यकीय सेवेतील ७२३ पदे भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 11:57 IST

सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय सेवेतील ७२३ पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देसंचालक संजीव कांबळे स्क्रब टायफसबाबत नागपुरात घेतली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय सेवेतील ७२३ पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यातील सर्वाधिक पदे विदर्भातील आहेत. विशेष म्हणजे, जे डॉक्टर १० दिवसात रुजू होणार नाहीत, अशा डॉक्टरांची सेवा संपुष्टात आणून प्रतीक्षा यादीतील डॉक्टरांना संधी दिली जाणार आहे. या पदांमुळे आरोग्य विभागातील कामकाजाला गती येईल, असा विश्वास राज्याचे आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी येथे व्यक्त केला.विदर्भासह आजूबाजूच्या राज्यात वाढत असलेल्या स्क्रब टायफस संदर्भात डॉ. कांबळे यांनी रविवारी नागपूरच्या उपसंचालक आरोग्य विभागाच्या कार्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर ते ‘लोकमत’शी बोलत होते.डॉ. कांबळे म्हणाले, आरोग्य विभागात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरती प्रक्रियेसाठी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी पुढाकार घेतल्याने राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील वर्ग ‘अ’ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदभरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.पहिल्या टप्प्यात एकूण ७२३ पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी कार्यालयात सुमारे साडेतीन हजार अर्ज आले आहेत. यामुळे एका डॉक्टराची नियुक्ती झाली आणि १० दिवसात ते रुजू झाले नाहीत तर त्या जागी प्रतीक्षा यादीतील डॉक्टरांची वर्णी लावली जाणार आहे. परिणामी, सर्व पदे भरली जाण्याची शक्यता आहे.

स्क्रब टायफसवर नियंत्रणासाठी सर्वाेतोपरी प्रयत्नडॉ. कांबळे म्हणाले, स्क्रब टायफसवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाकडून सर्वाेतोपरी प्रयत्न होत आहे. या रोगाची गंभीर दखल आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी घेतली. त्यांच्या सूचनेनुसार उपाययोजना सुरू आहेत. स्क्रब टायफस संशयित रुग्ण आढळून येताच ‘डॉक्सीसायक्लीन’ हे औषध देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मेडिकलमध्ये ‘एलायझा’ चाचणी उपलब्ध करून देण्यात आली असून ‘डॉक्सीसायक्लीन’ औषधेही देण्यात आली आहे. शिवाय, लोकांची जनजागृतीसाठी पत्रके वाटली जात आहेत. कीटकनाशक फवारणीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सध्या स्क्रब टायफस नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत ४१ रुग्ण व १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ३१ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले असून उर्वरीत ११ रुग्ण हे मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशातील आहेत.

आयएमए, निमा, आयुषची मदत घेणारस्क्रब टायफसवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’सह(आयएमएए), निमा, आयुष व इतरही वैद्यकीय संघटनांची मदत घेतली जाणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या आरोग्य विभागाच्या ‘कंट्रोल रुम’ला स्क्रब टायफसची नोंद घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असल्याचे डॉ. कांबळे म्हणाले.

घरात डेंग्यूच्या अळ्या दिसल्यास दंडात्मक कारवाईडेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. डेंग्यू रोगाचा प्रादुर्भाव, प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती ही सर्वात जास्त नागरिकांच्या घरात आणि घर परिसरात साठलेल्या पाण्यात होते. उदा. पाण्याची टाकी, रांजण, माठ, कूलर, फ्रिजमागील ट्रे, हौद, फुलदाणी, टायर, भंगार वस्तू, घराचे छत आदी ठिकाणे डासांची उत्पत्ती स्थाने आहेत. बहुतांश नागरिक डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेत असले तरी काही जणांकडून त्याकडे दुर्लक्ष होते. डास उत्पत्ती प्रतिबंधात्मक कार्यवाहीबाबत आरोग्य विभागाकडून शिक्षण दिले जाते. तरीदेखील काही नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने आता दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती डॉ. कांबळे यांनी दिली. यावेळी उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, डॉ. फारूखी, सहायक संचालक (हिवताप) डॉ. मिलिंद गणवीर व इतरही अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्य