शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ७२ हजार मोकाट कुत्र्यांवर नसबंदी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 21:35 IST

एका एजन्सीकडे दिवसाला २०० कुत्र्यांची नसबंदी करण्याची जबाबदारी दिली आहे. आणखी एका एजन्सीची नियुक्ती करून दिवसाला ४०० तर दहा महिन्यात ७२ हजार कुत्र्यांची नसबंदी के ली जाईल, अशी माहिती मंगळवारी महापौर संदीप जोशी यांनी दिली.

ठळक मुद्देदर महिन्यात १२ हजार नसबंदीचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोकाट कुत्र्यांमुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत. कुत्र्यांनी चावा घेणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली. मोकाट कुत्र्यांंना आळा घालण्यासाठी महापालिकेने वेळोवेळी नसबंदीची मोहीम राबविली. परंतु त्यात फारसे यश आले नाही. याचा विचार करता आता व्यापक मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे. एका एजन्सीकडे दिवसाला २०० कुत्र्यांची नसबंदी करण्याची जबाबदारी दिली आहे. आणखी एका एजन्सीची नियुक्ती करून दिवसाला ४०० तर दहा महिन्यात ७२ हजार कुत्र्यांची नसबंदी के ली जाईल, अशी माहिती मंगळवारी महापौर संदीप जोशी यांनी दिली.मोकाट कुत्र्यांच्या संख्येला वेळीच आळा घातला नाही तर वर्षभरात शहरात दीड लाख मोकाट कुत्रे होतील. पुढील काही वर्षात ही संख्या पाच लाखांवर जाईल. यातून गंभीर समस्या निर्माण होईल. त्यामुळे वेळप्रसंगी एखादा सिमेंट रोड झाला नाही तरी चालेल, परंतु नसबंदीचा व्यापक कार्यक्रम राबविण्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल. अशी माहिती जोशी यांनी दिली.मोकाट कुत्र्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेतर्फे वेळोवेळी कुत्र्यांवर नसबंदीची मोहीम राबविण्यात आली होती. हे काम खाजगी कंपनीकडे सोपविण्यात आले होते. परंतु यात फारसे यश आले नाही. या वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या पाच महिन्यात ४ हजार ६२९ लोकांना कु त्र्यांनी चावा घेतल्याची प्रकरणे पुढे आली. तसेच कुत्र्यांमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महापालिकेने आता हा विषय गंभीरतेने घेतला असून व्यापक नसबंदी मोहीम राबविली जाणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाdogकुत्रा