शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या अवयवदानासाठी ७० वर्षीय आईचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 21:44 IST

कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असलेल्या ५० वर्षीय मुलाचे अचानक ‘ब्रेन डेड’ झाले. डॉक्टरांनी अवयवदानाचे आवाहन केले. यात सर्वात आधी ७० वर्षीय आईने काळजावर दगड ठेवत अवयवदानाचा निर्णय घेतला. यात त्यांच्या पत्नी व भावाचाही सहभाग होता. पहिल्यांदाच वयोवृद्ध आईने घेतलेला हा पुढाकार अवयवदान चळवळीला आलेल्या गतीचे द्योतक असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देनागपुरातील  पहिलीच घटना : तिघांना जीवनदान तर दोघांना मिळणार दृष्टी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असलेल्या ५० वर्षीय मुलाचे अचानक ‘ब्रेन डेड’ झाले. डॉक्टरांनी अवयवदानाचे आवाहन केले. यात सर्वात आधी ७० वर्षीय आईने काळजावर दगड ठेवत अवयवदानाचा निर्णय घेतला. यात त्यांच्या पत्नी व भावाचाही सहभाग होता. पहिल्यांदाच वयोवृद्ध आईने घेतलेला हा पुढाकार अवयवदान चळवळीला आलेल्या गतीचे द्योतक असल्याचे बोलले जात आहे.नरेंद्र नगर येथील रहिवासी संजय हिरालाल नाईक (५०) असे त्या मेंदू मृत (ब्रेन डेड) अवयवदात्याचे नाव.प्राप्त माहितीनुसार, संजय नाईक हे एका खासगी कंपनीत कार्यरत होते. त्यांना दोन मुली आहेत. २५ डिसेंबर रोजी नाईक यांची अचानक प्रकृती खालवली. त्यांना तातडीने डिगडोह येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथे ‘ब्रेन हॅमरेज’ असल्याचे निदान झाले. नाईक यांची गंभीर प्रकृती पाहता त्यांना २६ डिसेंबर रोजी केअर हॉस्पिटलमध्ये नेले. येथील डॉक्टरांनी नाईक यांचा ‘ब्रेन डेड’ झाल्याची माहिती नातेवाईकांना दिली. त्या दु:खातही ७० वर्षीय त्यांची आई वनमाला नाईक यांनी पुढाकार घेतला. नाईक यांची पत्नी व त्यांचे मोठे बंधू अजय नाईक यांनीही अवयवदानाला दुजोरा दिला. याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर’ला (झेडटीसीसी) देण्यात आली. समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्या मार्गदर्शनात मूत्रपिंड समितीच्या अध्यक्ष डॉ. चारुलता बावनकुळे, यकृत समितीचे अध्यक्ष डॉ. सुधीर टॉमी व नागपूर झोन कॉर्डीनेटर वीना वाठोरे यांनी पुढील प्रक्रिया पार पाडली. नाईक यांच्या अवयवदानामुळे तिघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली.८३ मूत्रपिंड प्रत्यारोपणसंजय नाईक यांच्याकडून झालेल्या अवयवदानातून एक मूत्रपिंड केअर हॉस्पिटलला तर दुसरे मूत्रपिंड वोक्हार्ट हॉस्पिटलच्या रुग्णाला देण्यात आले. हे आतापर्यंतचे ८२ व ८३ मूत्रपिंड प्रत्यारोपण ठरले. तर एलेक्सीस हॉस्पिटलच्या ५९ वर्षीय महिलेवर यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. नागपूर विभागातील हे ३३ ‘लिव्हर रिट्रायव्हल’ ठरले. नेत्रदान महात्मे नेत्रपेढीला करण्यात आले.

टॅग्स :Organ donationअवयव दानnagpurनागपूर