परिवहन आयुक्तांची माहिती : गावखेड्यातून ‘सीएससी’च्या माध्यमातून आरटीओला अर्ज करता येणार नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) ६८८ सहायक मोटार वाहन निरीक्षक मिळणार आहेत. यातील १८८ सहायक मोटार वाहन निरीक्षकांची जाहिरात निघाली असून लवकरच ५०० सहायक मोटार वाहन निरीक्षकांची जाहिरात निघणार आहे. याशिवाय नुकतेच ८८ कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सोबतच पदांची संख्या वाढविण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे लवकरच आरटीओ कार्यालयांतील रिक्त पदांची संख्या निकाली निघण्याची शक्यता आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी ‘लोकमत’ला दिली. आरटीओ कार्यालयांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी डॉ. गेडाम नागपूरला आले असता ते बोलत होते. नुकतेच कार्यान्वित झालेल्या ‘सारथी वेबसेस’ प्रणालीतील समस्यांविषयी डॉ. गेडाम म्हणाले, या प्रणाली संदर्भातील समस्या केवळ नागपुरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे. हा प्रकल्प ‘एनआयसी’चा आहे. त्यांच्याशी बोलणे सुरू असून येत असलेल्या अडचणी सांगितल्या जात आहे. येत्या महिनाभरात या समस्या दूर होण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)
६८८ सहायक मोटार वाहन निरीक्षक मिळणार
By admin | Updated: February 8, 2017 03:02 IST