शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

१४ बँकांना ६८०० कोटी रुपयांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:09 IST

विनसम समूह : एसएलसीचा दुरुपयोग करून फसवणूक

नागपूर : विजय मल्ल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्जबुडव्या विनसम समूहाच्या जतीन मेहताने १५ भारतीय बँकांना ६८०० कोटी रुपयांचा फटका कसा दिला, ते आता समोर आले आहे.बँक आॅफ इंडियाच्या नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या एका जनरल मॅनेजरने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला जी माहिती दिली ती धक्कादायक आहे. या अधिकाºयाच्या मते जतीन मेहताने योजनाबद्ध पद्धतीने बँकांकडून स्टँडबाय लेटर आॅफ क्रेडिट (एसएलसी)च्या माध्यमातून ही कर्जे काढली आहेत.एसएलसीद्वारे फसवणूकविनसम डायमंड्स व फॉरएव्हर डायमंड्स या कंपन्यांनी विदेशातील बुलीयन बँक्स सोने व्यापाºयांच्या नावाने एसएलसी जारी करवून घेतल्या व त्यामार्फत सोने आयात केले व त्याचे दागिने बनवून संयुक्त अरब अमिरातीमधील व्यापाºयांना निर्यात केले. या एसएलसीच्या अटीमध्ये निर्यात केलेल्या दागिन्यांची रक्कम कंपन्यांना मिळाल्यानंतर कर्जफेड केली जाईल, अशी अट होती. अशाप्रकारे या दोन्ही कंपन्यांनी १५ बँकांकडून ६८०० कोटींचे कर्ज २०१० ते २०१२ दरम्यान घेतले व नंतर हात वर केले. आम्ही ज्या व्यापाºयांना दागिने निर्यात केले होेते त्या व्यापाºयांना सोन्याच्या सट्टाबाजारात नुकसान आले. त्यामुळे त्यांनी आम्हाला पैसे दिले नाहीत म्हणून आम्ही बँकांची कर्जफेड करू शकत नाही, असा युक्तिवाद दोन्ही कंपन्यांनी केला. करारातील अटीमुळे बँकांनी या कंपन्यांकडून कर्जवसुली केली नाही.जतीन मेहता व त्याचे सर्व कुटुंबीय कॅरेबियन आयलँड्समधील सेंट किट्सचे नागरिक आहेत. २०१३ साली ते भारतातून पसार झाले. पण या १५ भारतीय बँकात बँक आॅफ इंडियासुद्धा आहे का? या प्रश्नावर संबंधित अधिकाºयाने उत्तर देण्यास नकार दिला. दरम्यान, बँकांनी तक्रार केल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून सीबीआय व प्रवर्तन निदेशालय (ईडी) या प्रकरणाची चौकशी करत असून संयुक्त अरब अमिरातीमधील बँकांनी तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.नेमका घोटाळा कसा घडला?विनसम समूहाच्या दोन कंपन्या आहेत. विनसम डायमंड्स अ‍ॅण्ड ज्वेलरी व फॉरएव्हर डायमंड्स. या दोन्ही कंपन्या हिरेजडीत दागिन्यांचा व्यवसाय करत होत्या. त्यासाठी त्या सोने विदेशातून आयात करत होत्या व भारतात दागिने बनवून निर्यात करत होत्या. या कंपन्यांनी सोने आयात करण्यासाठी बँकांकडून ६८०० कोटींची कर्जे एसएलसीमार्फत घेतली व ती बुडवून १५ बँकांना चुना लावला, अशी माहिती या अधिकाºयाने दिली.

टॅग्स :fraudधोकेबाजीBank of Indiaबँक ऑफ इंडिया