शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

उपराजधानीतील व्यापाऱ्यांना विक्रीकर विभागाने दिला ६५०.४८ कोटींचा परतावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:10 IST

नागपूर विभागीय विक्रीकर विभागाने १ एप्रिल २०१३ ते ३१ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत एकूण ३,९८९ प्रकरणांमध्ये उद्योजक व व्यावसायिकांना ६५०.४८ कोटी रुपयांचा परतावा दिला आहे.

ठळक मुद्देमाहितीच्या अधिकारातील माहिती३,९८९ प्रकरणे आणि १४९ धाडी

आॅनलाईन लोकमतनागपूर : नागपूर विभागीय विक्रीकर विभागाने १ एप्रिल २०१३ ते ३१ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत एकूण ३,९८९ प्रकरणांमध्ये उद्योजक व व्यावसायिकांना ६५०.४८ कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या पहिल्या सात महिन्यात १३८ प्रकरणांमध्ये केवळ १७.३९ कोटींचा परतावा दिल्याची बाब माहितीच्या अधिकारात पुढे आली आहे.प्राप्त माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये ९३५ प्रकरणांत ९७.७९ कोटींचा परतावा, २०१४-१५ मध्ये १७१२ प्रकरणांत २१४.३७ कोटी, वर्ष २०१५-१६ मध्ये ५१७ प्रकरणांमध्ये १४४.५८ कोटी आणि आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये ६८७ प्रकरणांमध्ये विभागाने १७६.३५ कोटींचा परतावा (रिफंड) दिला आहे. ही माहिती अभय कोलारकर यांना विक्रीकर विभागाने माहितीच्या अधिकारांतर्गत दिली आहे.एका प्रश्नाच्या उत्तरात विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, १ एप्रिल २०१३ ते ३० सप्टेंबर २०१७ या काळात विभागाकडे एकूण ६८ तक्रारींची नोंद आहे. तसेच १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत कर वसुलीसाठी कार्यालयाने टाकलेल्या धाडीची संख्या १४९ एवढी आहे. कर चुकवेगिरी करणाऱ्या  व्यापाऱ्यांचे बँक खाते गोठविल्याची आकडेवारी उपलब्ध नसल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले.याशिवाय माहितीच्या अधिकारात विक्रीकर विभागाने २००५-०६ ते २०१६-१७ या आर्थिक वर्षांतील आणि आार्थिक वर्ष २०१७-१८ च्या जुलै महिन्यापर्यंत कर वसुलीची माहिती दिली आहे. गेल्या वर्षी विक्रीकर विभागाच्या मुंबई, ठाणे, ग्रामीण पालघर, रायगड, पुणे, सोलापूर, नाशिक, धुळे, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नांदेड या विभागातून एकूण ९० हजार ५२५ कोटी रुपयांचा व्हॅट गोळा केला होता. त्यातुलनेत चालू आर्थिक वर्षात जुलैपर्यंत ३४ हजार कोटी ४७८ कोटींचा कर गोळा केला. तसे पाहता १ जुलैपासून संपूर्ण भारतात वस्तू आणि सेवा करांची (जीएसटी) अंमलबजावणी करण्यात आली आहे. या तारखेपासून जीएसटी किती वसूल केला, याची आकडेवारी नाही. कर न भरल्यामुळे किती व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, या प्रश्नाची आकडेवारी विभागाकडे उपलब्ध नाही.