शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संशयाच्या किड्याने केला घात...! ५५ वर्षीय पत्नीवर संशय, ६५ वर्षीय वृद्धाने केली हत्या; मुलावरही वार

By योगेश पांडे | Updated: May 8, 2024 22:04 IST

इंदिराबाई गिरधारी भारद्वाज (५५, माता मंदिरजवळ, सुरादेवी, कोराडी) असे मृतक महिलेचे नाव असून गिरधारी मुर्तीराम भारद्वाज (६५) हा आरोपी पती आहे. त्यांना तीन मुले होती व दोन मुले सोबतच राहत होती. गिरधारी तापट स्वभावाचा असून त्याने अनेकदा पत्नीशी वाद घातला होता. तो पत्नीवर वारंवार संशय घ्यायचा.

नागपूर : संशयाचा किडा मनात शिरल्यामुळे एका दांपत्याचा ३३ वर्षांपासूनचा संसार उध्वस्त झाला. चारित्र्यावर संशय घेत ६५ वर्षीय पतीने ५५ वर्षीय पत्नीची डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालत हत्या केली. तर पोटच्या मुलालादेखील जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संपूर्ण कुटुंबासमोर सकाळी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.इंदिराबाई गिरधारी भारद्वाज (५५, माता मंदिरजवळ, सुरादेवी, कोराडी) असे मृतक महिलेचे नाव असून गिरधारी मुर्तीराम भारद्वाज (६५) हा आरोपी पती आहे. त्यांना तीन मुले होती व दोन मुले सोबतच राहत होती. गिरधारी तापट स्वभावाचा असून त्याने अनेकदा पत्नीशी वाद घातला होता. तो पत्नीवर वारंवार संशय घ्यायचा. इतकेच काय तर मुलगा देवेंद्रवरदेखील (३२) अनेकदा संशय घ्यायचा. यातून त्याने बऱ्याच वेळा त्यांना धमकी दिली होती. बुधवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास देवेंद्र हा घरच्या किराणा दुकानात बसला होता व त्याचा मित्रदेखील तेथे उपस्थित होता. इंदिराबाई व आरोपी हॉलमध्ये बसले होते. गिरधारीने वाद घालण्यास सुरुवात केली व तुम्ही दोघेही माझ्या घरातून निघून जा असे बोलायला सुरुवात केली. नेहमीप्रमाणेच गिरधारी बडबड करत आहे असे समजून आई, मुलाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र अचानक गिरधारीने कुऱ्हाड आणखी व इंदिराबाईंच्या डोक्यात वार केले. आवाज ऐकून देवेंद्र धावत गेला असता त्याच्यावरदेखीर गिरधारीने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र देवेंद्रच्या मित्राने गिरधारीला अडविले. संतापलेला गिरधारी कुऱ्हाड घेऊन मित्राच्या मागे धावला. दरम्यान आरडाओरड ऐकून देवेंद्रचा भाऊ व वहिनीदेखील धावत आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या इंदिराबाईंना खाजगी इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. देवेंद्रच्या तक्रारीवरून गिरधारीविरोधात कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिस