शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बंधारे बांधकामात ६५ लाखांचा घोटाळा

By admin | Updated: November 16, 2014 00:42 IST

काटोल आणि नरखेड तालुक्यातील बंधारे बांधकामात गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासाअंती १४ जणांविरुद्ध ‘एसीबी’ (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)ने गुन्हे दाखल केले आहे. तब्बल सहा वर्षांनंतर

अधिकऱ्यांसह कंत्राटदार अडकले : ‘एसीबी’ने केला गुन्हा दाखलनागपूर : काटोल आणि नरखेड तालुक्यातील बंधारे बांधकामात गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासाअंती १४ जणांविरुद्ध ‘एसीबी’ (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)ने गुन्हे दाखल केले आहे. तब्बल सहा वर्षांनंतर याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले, हे विशेष!२००६-०७ मध्ये नागपूर जिल्हा परिषदेकडून ३० बंधारे बांधकामासाठी २.५८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. या बंधाऱ्याचे बांधकाम झाले. मात्र त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती. या तक्रारीच्या आधारे बंधाऱ्याच्या कामाची तपासणी करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याचे विशेष तपासणी पथक तयार करण्यात आले. विशेष तपासणी पथकाने बंधाऱ्याचे पायवे खोदून तपासणी केली असता प्रत्यक्ष बांधकाम केले नसल्याचे आढळले. मात्र बांधकाम केल्याचे दर्शवून त्याबाबत मोजमाप पुस्तकात खोट्या नोंदी करून ६५ लाख १३ हजार २२८ रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले. या तपासणी पथकाने ३० पैकी २५ बंधाऱ्यांची तपासणी करून अहवाल दिला. त्यावरून लोकसेवकांनी खाजगी कंत्राटदारांना गुन्ह्यात मदत करून आर्थिक लाभ मिळवून दिल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्या १४ जणांविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १३ (१) क, सहकलम १३ (२) व १५ तसेच लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यासह भादंविच्या कलम ४२०, ४०९, ४६८, ४७१, १२० (ब), ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक वसंत शिरभाते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक मिलिंद तोतरे, सहकारी रमेश भोयर, कोमल बिसेन यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)हे आहेत आरोपीलघु पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता बलदेव माधव सांगोडे (५९), चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता व्यंकट आयला सोमयाजुला (५९), सिंचन विभागाच्या नरखेड उपविभागाचे सेवानिवृत्त उपअभियंता नामदेव अप्पा गजभिये (५९), जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाचे शाखा अभियंता नंदकिशोर नारायणदास पुरोहित (४६), सिंचन विभागाचे दिलीप सुधाकर सातफळे (४७), सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अभियंता कृष्णराव लक्ष्मण झलके (६१), जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव भांडारकर, वरुडचे उच्च श्रेणी गटविकास अधिकारी प्रकाश तट्टे, खाजगी कंत्राटदार वसंत चंद्रभान निकाजू, चंदू केशव चरपे, अशोक एम. ठाकूर, राहुल रमेश श्रीवास्तव, यशवंत रामराव काळबांडे, गंगाधर कुमेरिया या १४ जणांविरुद्ध आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.