शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यात नागपूर विमानतळावर ६.२८ लाख प्रवासी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:08 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अन्य ठिकाणी जाणारे आणि येणाऱ्या प्रवाशांमध्ये जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात गेल्या वर्षीच्या याच महिन्यांच्या तुलनेत ६,२८,१४० प्रवाशांची वाढ झाली आहे.

ठळक मुद्देघरगुती व आंतरराष्ट्रीय प्रवासी : एकूण प्रवासी २८ लाख ४ हजार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्या उद्योग आणि व्यवसायात मंदीचे वातावरण असतानाही हवाई वाहतूक व्यवसायात सुगीचे दिवस आहेत. मिहान इंडिया लिमिटेडकडून (एमआयएल) प्राप्त अहवालानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अन्य ठिकाणी जाणारे आणि येणाऱ्या प्रवाशांमध्ये जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात गेल्या वर्षीच्या याच महिन्यांच्या तुलनेत ६,२८,१४० प्रवाशांची वाढ झाली आहे.नागपूर विमानतळावर यावर्षी हवाई प्रवाशांच्या वाहतुकीत वाढ झाली आहे. यामध्ये घरगुती, आंतरराष्ट्रीय आणि चार्टर्ड विमानांनी प्रवास करणाऱ्यांचा समावेश आहे. सन २०१९ मध्ये जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत २८ लाख ४ हजार ५७९ प्रवाशांनी तर गेल्या वर्षीच्या या महिन्यात २१ लाख ७६ हजार ४३९ प्रवाशांनी प्रवास केला होता. तुलनात्मरीत्या आकडेवारीनुसार यावर्षी ६ लाख २८ हजार १४० प्रवासी जास्त असल्याची माहिती मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ विमानतळ संचालक आणि मुख्य कार्यान्वयन अधिकारी विजय मुळेकर यांनी दिली. नागपूर विमानतळावर हवाई प्रवासी वाहतूक वाढल्यामुळे सन २०२५-२६ पर्यंत हे विमानतळावर देशात अग्रस्थानाच्या यादीत येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.मुळेकर म्हणाले, विमानतळावरून प्रवाशांची संख्या वाढली असून एमआयएलने योग्यरीत्या नियोजन केले. नागपूर विमानतळाच्या पायाभूत सुविधांचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. याकरिता निविदा प्रक्रिया पूर्णत्वास आल्या असून जीएमआर समूहाला निविदा मंजूर झाली आहे. कंपनीने १४.४९ टक्के शासनाला देण्याचे मंजूर केले आहे. १,६८५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून विमानतळाचा विस्तार करण्यात येणार आहे. विस्तारीकरण प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यास जीएमआर समूह विमानतळाचे आधुनिकीकरण आणि संचालन करणार आहे. तथापि, हवाई वाहतूक सेवेचे संचालन भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे करण्यात येणार आहे. विस्तारीकरणात नवीन टर्मिनल इमारत, धावपट्टी, अ‍ॅप्रॉन आणि अधिकाधिक प्रवासी व कॉर्गो सेवेसाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहे. याकरिता अतिरिक्त जागेचे अधिग्रहण करण्यात आले असून विमानतळाकडे एकूण १,००.२१ हेक्टर जागा उपलब्ध झाली आहे.

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरpassengerप्रवासी