शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकावर दारूच्या ६१८ बॉटल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:32 IST

रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावर विविध रेल्वेगाड्यातून दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिला आणि एका पुरुषाला अटक करून त्यांच्या जवळून २०१५० रुपये किमतीच्या दारूच्या ६१८ बॉटल जप्त केल्या आहेत.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : तीन महिला, एका पुरुषास अटक

  लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावर विविध रेल्वेगाड्यातून दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिला आणि एका पुरुषाला अटक करून त्यांच्या जवळून २०१५० रुपये किमतीच्या दारूच्या ६१८ बॉटल जप्त केल्या आहेत.रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गठित केलेल्या चमूतील सदस्य उपनिरीक्षक ए. पी. सिंह, शशिकांत गजभिये, विकास शर्मा, विवेक कनोजिया, दीपक पवार, संतोष पटेल, अनिस खान, अर्जुन पाटोले हे बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर उभ्या असलेल्या १२२९६ संघमित्रा एक्स्प्रेसची तपासणी करीत होते. त्यांना एस ९ कोचमध्ये तीन महिला संशयास्पद स्थितीत आढळल्या. त्यांनी आपले नाव वैशाली आशिष झाडबुके (३५), विमल वसंता भगत (६०) आणि सुनिता संजय काळे (५४) रा. चंद्रपूर सांगितले. त्यांच्या जवळील बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या १११८० रुपये किमतीच्या ४३० बॉटल आढळल्या. याच गाडीच्या मागील जनरल कोचमध्ये दयानंद साळवे (५५) रा. चंद्रपूर याच्या जवळील बॅगमध्ये दारुच्या ३२५० रुपये किमतीच्या १२५ बॉटल आढळल्या. तर सायंकाळी ५.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर इटारसी एण्डकडील भागात एक बेवारस बॅग आढळली. आजूबाजूच्या प्रवाशांना या बॅगबाबत विचारणा केली असता त्यावर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या ५७२० रुपये किमतीच्या ६३ बॉटल आढळल्या. उपनिरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्या सूचनेवरून पकडण्यात आलेली दारू आणि आरोपींना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द करण्यात आले आहे.गुटख्याची ३२ पाकिटे जप्तसंघमित्रा एक्स्प्रेसमध्ये दारूची कारवाई केल्यानंतर विकास शर्मा याने या गाडीच्या एस ७ कोचची तपासणी केली. यावेळी त्यास कोचमध्ये सीटखाली पांढºया रंगाचे पोते दिसले. आजूबाजूच्या प्रवाशांना विचारणा केली असता त्यावर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. या पोत्याची खाली उतरून तपासणी केली असता त्यात पान मसाला, गुटख्याचे २२०० रुपये किमतीचे ३२ पाकिट आढळले. जप्त करण्यात आलेला गुटखा, पान मसाला मुख्य आरोग्य निरीक्षकांच्या सुपूर्द करण्यात आला.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरliquor banदारूबंदी