शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोगामुळे ६० हजार मृत्यूची नोंद :सुशील मानधनिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 21:47 IST

जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘ग्लोबोकॉन २०१८’नुसार देशात २०१८ मध्ये ११ लाख ५७ हजार २९४ कर्करोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील सात लाख ८४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात  एक लाख ७२ हजार रुग्ण आढळून आले असून, यातील ६० हजार रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. धक्कादायक म्हणजे, राज्यात केवळ पाचच रुग्णालयात कर्करोगाच्या रुग्णांची नोंद होते. यामुळे याच्या कित्येकपटीने रुग्ण असण्याची शक्यता आहे. कर्करोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी या रोगाला ‘नोटीफायबल डिसिज’मध्ये टाकणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देराज्यात केवळ पाचच रुग्णालयात कर्करोगाची नोंदणी

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘ग्लोबोकॉन २०१८’नुसार देशात २०१८ मध्ये ११ लाख ५७ हजार २९४ कर्करोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील सात लाख ८४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात  एक लाख ७२ हजार रुग्ण आढळून आले असून, यातील ६० हजार रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. धक्कादायक म्हणजे, राज्यात केवळ पाचच रुग्णालयात कर्करोगाच्या रुग्णांची नोंद होते. यामुळे याच्या कित्येकपटीने रुग्ण असण्याची शक्यता आहे. कर्करोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी या रोगाला ‘नोटीफायबल डिसिज’मध्ये टाकणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांनी व्यक्त केले.सोमवारी जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात आला. या दिनाच्या अनुषंगाने आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.डॉ. मानधनिया म्हणाले, भारतात कर्करोगाने मृत्यू झालेल्या पुरुषांची संख्या चार लाख १३ हजार तर महिलांची संख्या तीन लाख ७१ हजार आहे. पुरुषांमध्ये मुखाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, आतड्यांचा कर्करोग व अन्ननलिकेचा कर्करोग धोकादायक ठरतो, तर महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग, मुखाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग व फुफ्फुसाचा कर्करोग जोखमीचा ठरत आहे. महाराष्ट्रातही कर्करोग वाढत आहे. परंतु त्यावरील उपाययोजना अद्यापही तोकड्या आहेत. याला एक महत्त्वाचे कारण म्हणजे, ‘एचआयव्ही’ किंवा ‘स्वाईन फ्लू’रोगाच्या रुग्णांची शासनस्तरावर जशी नोंदणी होते तशी नोंदणी कर्करोगाची होत नाही. राज्यात कर्करोगाच्या रुग्णांचा नेमका आकडा समोर येत नसल्याने, व्यापक उपाययोजना होत नसल्याचे वास्तव आहे.गर्भाशयाच्या कर्करोगामुळे प्रत्येक आठ मिनिटात एकाचा मृत्यूडॉ. मानधनिया यांनी सांगितले, ग्रामीण व दुर्गम भागात स्तनाच्या कर्करोगाच्या तुलनेत गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण मोठे आहे. या कर्करोगामुळे प्रत्येक आठ मिनिटात एका महिलेचा मृत्यू होतो. शहरी भागात स्तनाचा कर्करोग वाढत असून, २२ पैकी एका रुग्णाचा मृत्यू होतो. विशेष म्हणजे, कर्करोगाच्या जनजागृती अभावामुळे कर्करोगाचे रुग्ण हे दुसऱ्या ते तिसऱ्या टप्प्यात उपचारासाठी येतात. यामुळे ५० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. कीटकनाशकांचा वाढता वापर धोकादायककीटकनाशकांचा वाढता वापर, प्रदूषण, तंबाखूचे व्यसन, अयोग्य जीवनशैली व व्यायामाचा अभाव, हे कर्करोगाला कारणीभूत ठरत असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात डॉ. मानधनिया यांनी सांगितले.

टॅग्स :cancerकर्करोगdoctorडॉक्टर