शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नदीकाठावर लावणार ६० हजारांवर बांबूची झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 23:21 IST

महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत नागपूर महापालिकेने एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट घेतले आहे. याची तयारी सुरू झाली आहे. मात्र, तत्त्पूर्वी ५ जूनला पर्यावरणदिनी आयुक्तांसह महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी प्रत्येकी पाच याप्रमाणे शहरातील नदीकाठांवर सुमारे ६० हजार बांबू आणि आजनच्या रोपट्यांची लागवड करणार आहेत. पदाधिकारी, नगरसेवकही यामध्ये सहभागी होणार असून या अभिनव उपक्रमाच्या तयारीचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी गुरुवारी दिले.

ठळक मुद्देमनपा करणार एक लाख वृक्षांची लागवड : आयुक्तांचे अभिनव उपक्रमाच्या तयारीचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत नागपूर महापालिकेने एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट घेतले आहे. याची तयारी सुरू झाली आहे. मात्र, तत्त्पूर्वी ५ जूनला पर्यावरणदिनी आयुक्तांसह महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी प्रत्येकी पाच याप्रमाणे शहरातील नदीकाठांवर सुमारे ६० हजार बांबू आणि आजनच्या रोपट्यांची लागवड करणार आहेत. पदाधिकारी, नगरसेवकही यामध्ये सहभागी होणार असून या अभिनव उपक्रमाच्या तयारीचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी गुरुवारी दिले.यासंदर्भात महापालिकेच्या सभागृहात बैठक पार पडली. अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, राजेश मोहिते यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.ादीकाठावर बांबू आणि आजनच्या झाडांची लागवड करण्याची संकल्पना आयुक्तांनी मांडली. शासकीय वृक्ष लागवड मोहिमेत एक लाख वृक्षांचे उद्दिष्ट असले तरी त्याव्यतिरिक्त नवा उपक्रम म्हणून नागपुरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदी या तीनही ठिकाणी एकाच दिवशी, एकाच वेळी वृक्षारोपण केले जाईल. झोननिहाय या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत असून नदीचे संपूर्ण नदीच्या पात्रात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. नदी ज्या भागातून जाते त्या भागातील प्रभागातील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसुद्धा प्रशासनातर्फे या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात येणार आहे. महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कामगारसुद्धा यामध्ये सहभागी होईल, अशी माहिती वीरेंद्र सिंग यांनी दिली.बांबू आणि आजनची वृक्ष लावण्यामागचा उद्देश असा की या झाडांना कुठलेही जनावरे खात नाही. त्यामुळे यांना ट्री गार्डची आवश्यकता पडणार नाही. नदीच्या तीरावर गाळ थांबविण्याचे कार्य ही वनस्पती करेल आणि या झाडांमुळे नदी तीराचे सौंदर्यही खुलेल.या संपूर्ण उपक्रमाची तयारी सुरू झाली असून ३ जून रोजी संपूर्ण तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. शासकीय मोहिमेतील वृक्ष लागवडीची तयारी १० जूनपर्यंत पूर्ण करायची असून तो कार्यक्रम पुढे महिनाभर चालणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBambu Gardenबांबू गार्डन