शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सूरतमध्ये सापडला ६० लाख रुपये फसवणुकीचा सूत्रधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 23:47 IST

शासकीय विभागात कार भाड्याने लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ६० लाख रुपयांची फसवणूक करून फरार युवक सहा वर्षानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती लागला. पोलिसांनी गुजरातच्या सूरत येथून त्याला अटक केली.

ठळक मुद्देसहा वर्षांपासून होता फरार : वाहन भाड्याने लावण्याच्या नावावर फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय विभागात कार भाड्याने लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ६० लाख रुपयांची फसवणूक करून फरार युवक सहा वर्षानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती लागला. पोलिसांनी गुजरातच्या सूरत येथून त्याला अटक केली. हर्षल नरेंद्र सूर्यवंशी (३४) रा. साईनगर पारडी असे आरोपीचे नाव आहे.हर्षल १२ वी नापास झाल्यानंतर ड्रायव्हरचे काम करीत होता. त्याने २०१३ मध्ये किरण डंगाले आणि सचिन उंबरकर यांच्या मदतीने फसवणुकीचे काम सुरू केले. हर्षल लोकांना आयकर, आरबीआय आणि रेल्वे विभागात कार भाड्याने लावून देण्याचे आमिष दाखवायचा. दर महिन्याला २५ ते ४० हजार रुपयाची कमाई होईल, असे आमिष तो लोकांना द्यायचा. वाहन भाड्याने लावून देण्यासाठी त्याने तीन लाखापर्यंत रक्कमही लोकांकडून वसूल केली होती. हर्षलने अनेक लोकांना आरबीआय, रेल्वे, आयकर विभागाचे बोगस दस्तावेज दिले होते. त्यामुळे लोकांना त्याच्यावर विश्वास बसला होता. युवराज धोंडेसह २१ लोकांकडून हर्षल तब्बल ६० लाख रुपये घेऊन फरार झाला होता. नियोजित वेळेत वाहन भाड्यावर न लागल्याने लोक चिंतेत पडले. चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला.आर्थिक गुन्हे शाखेने किरण डंगाले आणि सचिन उंबरकर यांना अटक केली. सचिनच्या खात्यात ५० हजार रुपये जमा झाले होते. तो बोगस आरबीआय अधिकारी बनला होता. तेव्हापासून पोलीस हर्षलला शोधत होते. तो सूरतमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या आधारावर १ मार्च रोजी त्याला सूरतमध्ये अटक करण्यात आली.हर्षल नागपुरातून फरार झाल्यानंतर तो पंजाब, दिल्ली, हरियाणासह अनेक शहरात फिरत राहिला. तिथे त्याने ड्रायव्हर म्हणून काम केले. हॉटेलमध्येही काम केले. अनेक शहरात फिरल्यानंतर त्याला सूरतमध्ये सहजपणे काम मिळेल, असा विश्वास होता. पोलीस हर्षलशी संबंधित लोकांवर पाळत ठेवून होते. त्याच्यामुळे पोलीस त्याला पकडू शकले. त्याला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास डीसीपी श्वेता खेळकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय स्नेहल राऊत करीत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीArrestअटक