शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

५९७३ पदवीधर नापास !

By admin | Updated: June 25, 2014 01:27 IST

पदवीधरच मतदार असल्याने सुशिक्षितांचा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या पदवीधर मतदारसंघात मतदान करताना एक नव्हे तर तब्बल ५९७३ मतदार चुकले. त्यामुळे त्यांची मते अवैध ठरली.

सुशिक्षित मतदारांकडूनही मतदानात चुका : ‘नोटा’चाही वापर जितेंद्र ढवळे-  नागपूर पदवीधरच मतदार असल्याने सुशिक्षितांचा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या पदवीधर मतदारसंघात मतदान करताना एक नव्हे तर तब्बल ५९७३ मतदार चुकले. त्यामुळे त्यांची मते अवैध ठरली. सुशिक्षित मतदारांच्या अशिक्षितपणाचेच हे उदाहरण ठरावे.उच्चशिक्षित मतदारांचा भरणा असलेल्या या निवडणुकीत मतदान करताना चुका अपेक्षित नसतात. सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे ही निवडणूक नसली तरी मतदानाची प्रक्रिया किचकटही नसते. सार्वत्रिक निवडणुकीत पसंतीच्या उमेदवारांच्या नावापुढील बटन दाबावे लागते तर येथे मतदारांना उमेदवारांच्या नावापुढे पसंतीक्रम लिहावा लागतो. मात्र तरीही दरवेळी मतदान करताना सुशिक्षित मतदार चुकतातच. यंदाही पाच हजारावर मतदारांनी चुका केल्या. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात मते वैध ठरली. काही मतदारांनी पसंतीक्रम टाकण्याऐवजी फक्त ‘राईट मार्क’ केले. काहींनी ‘नोटा’चा (नकारात्मक मतदान) पर्याय निवडताना मतपत्रिकेवरील इतर उमेदवारांच्या नावापुढेही पसंतीक्रमांक टाकला. काही मतदारांनी मतपत्रिकेवरील सर्वच उमेदवारांच्या नावापुढे ‘राईट मार्क’ केले, पसंतीक्रमांक टाकलाच नाही. काहींनी इंग्रजी आणि मराठी आकड्यांचा वापर केला. काही मतदारांनी पसंतीक्रमांकासोबतच खाली स्वाक्षरी करण्याचाही प्रयत्न केला. अशाच प्रकारच्या इतरही चुका मतदारांनी केल्याचे मतमोजणीदरम्यान आढळून आले. ११ उमेदवारांची अनामत जप्तनिवडणूक रिंगणात १४ उमेदवार होते. यापैकी प्रा. अनिल सोले विजयी ठरले. उर्वरित १३ पराभूत उमेदवारांपैकी बबन तायवाडे आणि किशोर गजभिये यांचा अपवाद सोडला तर इतर ११ ही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. अनामत रक्कम वाचविण्यासाठी एकूण वैध मतांच्या १/६ मते (१५,६८०) उमेदवारांना प्राप्त करायची होती. वरील दोन उमेदवार वगळता एकही उमेदवार अनामत रक्कम वाचवू शकला नाही. एका उमेदवाराने दोनशेचा, एकाने शंभरचा पल्ला गाठला. चार उमेदवारांना पन्नासपेक्षा कमी मते मिळाली.