शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचाऱ्यांचा ५९ महिन्यांचा एरिअर्स थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 21:54 IST

महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा ५९ महिन्यांचा एरिअर्स व ८० महिन्यांचा महागाई भत्ता देण्यासंदर्भात कर्मचारी संघटना व प्रशासनात चर्चा सुरू होती. यासंदर्भात आयुक्तांकडे गेल्या काही दिवसांपूर्वी बैठकही आयोजित करण्यात आली. यात निर्णय न झाल्याने पुन्हा चर्चा होणार होती. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरील चर्चा प्रलंबित राहिली. आता आचारसंहिता संपल्यानंतर यावर प्रशासनाकडून निर्णय होण्याची कर्मचाऱ्यांना आशा आहे.

ठळक मुद्देआचारसंहितेची झळ : कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा ५९ महिन्यांचा एरिअर्स व ८० महिन्यांचा महागाई भत्ता देण्यासंदर्भात कर्मचारी संघटना व प्रशासनात चर्चा सुरू होती. यासंदर्भात आयुक्तांकडे गेल्या काही दिवसांपूर्वी बैठकही आयोजित करण्यात आली. यात निर्णय न झाल्याने पुन्हा चर्चा होणार होती. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरील चर्चा प्रलंबित राहिली. आता आचारसंहिता संपल्यानंतर यावर प्रशासनाकडून निर्णय होण्याची कर्मचाऱ्यांना आशा आहे.महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू होऊ न नऊ वर्षे झाली; परंतु अद्याप कर्मचाऱ्यांना ५९ महिन्यांचा एरिअर्स मिळालेला नाही तसेच ८० महिन्यांचा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. हक्काचा पैसा मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांत नाराजी आहे. पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीच्या पदधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात वेळोवेळी चर्चा के ली. निदर्शने, लाक्षणिक संप व आंदोलने केली; परंतु त्यानंतरही न्याय मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांत नाराजी आहे.सहावा वेतन आयोग राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना २००६ सालापासून लागू करण्यात आला. महापालिकेत याची अंमलबजावणी १ डिसेंबर २०१० पासून करण्यात आली. राज्य कर्मचाऱ्यांना हा आयोग लागू करण्याला १३ वर्षे झाली तर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना १० वर्षे झाली. २००६ ते २०१० या दरम्यानच्या ५९ महिन्यांचा एरिअर्स कर्मचाऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. परंतु ही फरकाची रक्कम अजूनही मिळालेली नाही तसेच महागाई भत्त्यात झालेल्या वाढीची रक्कम वेळोवेळी देण्यात आलेली नाही. अशी जवळपास ८० महिन्यांची थकबाकी कर्मचाºयांना मिळालेली नाही.एरिअर्स व महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी, यासाठी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत समन्वय समिती गठित केली. या माध्यमातून वेळोवेळी आंदोलनाचा इशारा दिला. लाक्षणिक संपानंतर शिक्षक कर्मचारी संघटनेने मुंडण आंदोलन केले. प्रशासनाने दखल घ्यावी यासाठी समन्वय समितीने बेमुदत संपाची तयारी केली. कर्मचाऱ्यांची सहमती जाणून घेण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यात जवळपास ८० टक्के कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाला सहमती दर्शविली.दिवाळीत १० हजारामुळे संप टळलादिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांनी एरिअर्स व महागाई भत्ता मिळावा, यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने दिवाळीला कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रु. देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे आंदोलन टळले. मात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रु. देण्यात आले. यामुळे सेवानिवृत कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारी