शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

५५ आॅटोरिक्षांवर आरटीओची कारवाई

By admin | Updated: February 12, 2016 03:26 IST

उपराजधानीत प्रवासी घेऊन धावणारे ९,६३८ आॅटोरिक्षा आहेत. यातील बहुसंख्य आॅटोरिक्षांवर इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात आले आहेत,

४४ आॅटो जप्त : मीटर जाम असलेल्यांकडून वसूल केला दंडनागपूर : उपराजधानीत प्रवासी घेऊन धावणारे ९,६३८ आॅटोरिक्षा आहेत. यातील बहुसंख्य आॅटोरिक्षांवर इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात आले आहेत, परंतु बोटावर मोजण्याइतके आॅटोरिक्षा सोडल्यास मीटरने चालायला तयार नाहीत. याची गंभीर दखल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेताच, गुरुवारी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने ५५ आॅटोरिक्षांवर कारवाई करीत ४४ आॅटो जप्त केले.आरटीओ कार्यालयाने १ सप्टेंबर २०१४ पासून आॅटो मीटरनेच चालण्याची सक्ती केली होती. वचक बसावा म्हणून विशेष मोहिमेंतर्गंत १५०० वर आॅटोंवर कारवाई करण्यात आली. दरम्यानच्या काळात वाढलेले पेट्रोलचे दर लक्षात घेऊन आॅटोरिक्षाच्या भाडेदरातही वाढ केली. परंतु बहुसंख्य आॅटो मीटरने चालायलाच तयार नसल्याचे चित्र आहे. विशेषत: रेल्वे स्थानकावर प्रवाशांची लुट सुरू आहे. पालकमंत्री बावनकुळे यांच्याकडे या तक्रारी येताच त्यांनी जानेवारी महिन्यात अधिकाऱ्यांची बैठक बोलवून आढावा घेतला. आरटीओ कार्यालयाने विशेष पथक नेमून बुधवारी कारवाईला सुरुवातही केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरटीओने ११५ वाहने तपासली. यातील ५५ आॅटोरिक्षा मीटरने चालत नसल्याचे आढळून आले. या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सोबतच ४४ आॅटोमध्ये इतर गंभीर त्रुटी आढळून आल्याने ते जप्तही करण्यात आले. (प्रतिनिधी)