शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात वर्षाच्या अखेरच्या दिवशी तब्बल ५४३ रजिस्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 23:20 IST

543 registries on the last day of the year, nagpur news बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत देऊ केलेल्या ३ टक्के मुद्रांक शुल्क सवलतीचा फायदा ग्राहकांनी घेतला. गुरुवारी सवलत मिळण्याची अखेरची तारीख असल्याने नागपूर शहरातील सर्व नऊ मुद्रांक नोंदणी कार्यालयात रजिस्ट्रीसाठी रात्री ८ वाजेपर्यंत गर्दी होती.

ठळक मुद्देशासनाला मिळाला ६.२३ कोटीचा महसूल : सर्वच कार्यालयात गर्दी

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत देऊ केलेल्या ३ टक्के मुद्रांक शुल्क सवलतीचा फायदा ग्राहकांनी घेतला. गुरुवारी सवलत मिळण्याची अखेरची तारीख असल्याने नागपूर शहरातील सर्व नऊ मुद्रांक नोंदणी कार्यालयात रजिस्ट्रीसाठी रात्री ८ वाजेपर्यंत गर्दी होती. अखेरच्या दिवशी ५४३ रजिस्ट्री झाल्या आणि त्यातून शासनाला ६ कोटी २३ लाख ५० हजार ६८० रुपयाचा महसूल मिळाला.

राज्य शासनाने घोषणा केल्यानुसार, १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुद्रांक शुल्कात ३ टक्के सवलत आणि १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ पर्यंत २ टक्के सवलत देण्याची अधिसूचना ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात काढली होती. त्यानुसार १ सप्टेंबरपासून सर्व मुद्रांक कार्यालयात रजिस्ट्रीत वाढ होऊ लागली, पण त्याप्रमाणात शासनाला महसूल कमी मिळू लागला. राज्य शासनाने घोषणेमुळे घराच्या विक्रीला वेग आला आणि बांधकाम क्षेत्रातील मरगळ दूर झाली. त्यामुळे जुने प्रकल्प पूर्ण करण्यास वेग आला. अनेकांनी नवीन प्रकल्पाचे उद्घाटनही केले आणि फ्लॅट विक्री करू लागले. यातच ३ टक्के मुद्रांक शुल्क सवलतीची मुदत ३१ मार्चपर्यंत देण्याची मागणी क्रेडाई महाराष्ट्र मेट्रोने राज्य शासनाकडे लावून धरली होती. ३१ डिसेंबरला ३ टक्के सवलतीची मुदत संपली असून, १ जानेवारीपासून ग्राहकांना मुद्रांक शुल्कात २ टक्के सवलत मिळणार आहे.

डिसेंबरमध्ये सुटीच्या दिवशीही कार्यालय खुले

डिसेंबरमध्ये रजिस्ट्रीचा वेग वाढताच मुद्रांक नोंदणी कार्यालयाने शनिवारी सुटीच्या दिवशीही कार्यालय खुले ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवार १२, १९ आणि २६ तारखेला कार्यालय खुले होते. ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये रजिस्ट्रीची संख्या वाढू लागताच कार्यालयातील सर्व्हरचा वेग मंदावला. त्यामुळे एका रजिस्ट्रीसाठी तीन ते चार दिवस लागले.

पूर्व मुद्रांक शुल्क खरेदीचा चार महिने मिळणार फायदा

सवलतीमुळे रजिस्ट्री करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढू लागताच ३१ डिसेंबरपूर्वी घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्क खरेदी करणाऱ्यांना तब्बल चार महिने मुद्रांक शुल्कात ३ टक्के सवलत देण्याची घोषणा केली. त्यानुसार कोट्यवधी रुपयाच्या मुद्रांक शुल्काची ग्राहकांनी खरेदी केली. त्यामुळे त्यांना चार महिन्यापर्यंत ३ टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागRegistrarकुलसचिव