शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

पूर्व विदर्भात मधुमेहाचे ५३ हजार नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 10:44 IST

फारसा गंभीरपणे न घेतला जाणारा मधुमेह हळूवारपणे पसरत आहे. या आजाराचे ५३ हजार रुग्ण नव्याने पूर्व विदर्भात आढळले आहेत.

ठळक मुद्देसप्टेंबरमध्ये सर्र्वेेक्षणवर्धा जिल्ह्यात प्रमाण अधिक

गोपालकृष्ण मांडवकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फारसा गंभीरपणे न घेतला जाणारा मधुमेह हळूवारपणे पसरत आहे. या आजाराचे ५३ हजार रुग्ण नव्याने पूर्व विदर्भात आढळले आहेत. यामुळे एरवी साधा समजला जाणारा हा आजार गंभीरपणे घ्यावा लागणार आहे.मधुमेह या आजाराची व्यापकता लक्षात घेऊन जागतिक स्तरावरून या आजाराला पायबंद घालण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मधुमेह या आजारासह अन्य असंसर्गजन्य आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांच्या नोंदीसाठी झालेल्या सर्र्वेेक्षणमध्ये पूर्व विदर्भातील २८ लाख २० हजार ६८२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. असंसर्गजन्य आजार नियंत्रण तपासणी मोहिमेमध्ये राज्य शासनाच्या या उपक्रमामध्ये मधुमेहाने ग्रस्त असलेले ५२ हजार ७८० नवीन रुग्ण आढळले. १३ ते २८ सप्टेंबर या काळात ही तपासणी करण्यात आली होती. यात पूर्व विदर्भात सर्वाधिक २७ हजार २२६ रुग्ण फक्त वर्धा जिल्ह्यात आढळून आले आहेत. नागपूर जिल्ह्यात ४ हजार ८४०, चंद्रपूर जिल्ह्यात २ हजार ९३, गोंदिया जिल्ह्यात ८ हजार ४८०, भंडारा जिल्ह्यात ५ हजार ११३ तर गडचिरोली जिल्ह्यात ५ हजार ३७० रुग्णा आढळून आले आहेत.आजाराने आर्थिक शोषणमोठ्या प्रमाणावर पसरत असलेल्या या आजारामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण सुरू आहे. आजार एकदा चिकटला की त्याची तीव्रता शरीरात वाढू नये यासाठी रुग्णांकडून स्वत:वर औषधांचा आणि इंजेक्शनचा भडीमार केला जातो. यातून रुग्णांवर येणारे मानसिक दडपण व त्यापोटी निर्माण होणारे अन्य आजारही वेगळेच असतात. आजारांचे प्रमाण मोठे असल्याने त्यावरील औषधांची विक्रीही अधिक आहे. यातून रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण होत आहे.तणावमुक्त जीवन हाच उपायया आजारापासून दूर राहण्यासाठी तणावमुक्त जीवन हाच उपाय सांगितला जात आहे. अलीकडे वाढलेले धकाधकीचे जीवन, रात्रपाळीत चालणारे काम, कामावरील जागरण, कामातून निर्माण होणारा मानसिक ताण, आहाराच्या न पाळल्या जाणाऱ्या वेळा ही यामागील प्रमुख कारणे सांगितली जातात. यासोबतच मधुमेह हा आजार अनुवांशिकपणेही आढळून येतो. त्यावर उपाय म्हणून तणावमुक्त जीवन, वक्तशीर जीवनशैली आणि व्यायाम हा उपाय तज्ज्ञांकडून सांगितला जातो.

टॅग्स :Healthआरोग्यdiabetesमधुमेह