शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ५३ टक्के मतदान

By admin | Updated: February 22, 2017 02:24 IST

महापालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक विभागाने गेल्या काही दिवसापासून जनजागृतीवर भर दिला होता.

मतदान शांततेत : टक्केवारी फारशी वाढली नाही नागपूर : महापालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक विभागाने गेल्या काही दिवसापासून जनजागृतीवर भर दिला होता. परंतु प्रयत्नानंतरही नागपूर शहरातील मतदानाची टक्केवारी फारशी वाढलेली नाही. परंतु २०१२ च्या निवडणुकीच्या तुलनेत अधिक असून सरासरी ५३ टक्के मतदान झाले आहे. ईव्हीएमचा घोळ व काही तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. यासोबतच महापालिकेच्या १५१ जागांसाठी रिंगणात असलेल्या ११३५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. गुरुवारी या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. नागपूर शहरात २० लाख ९३ हजार ३९२ मतदार असून यातील ५३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ५२ हजारच्या आसपास नवीन मतदार आहेत. नागपुरात सकाळी पहिल्या दोन तासात ९.३० पर्यंत ८.६३ टक्के,११.३० पर्यंत १९.९५ टक्के, दुपारी १.३० पर्यंत ३१.२२ टक्के, दुपारी ३ .३० पर्यत ४३ टक्के तर सायंकाळी ५.३० पर्यत सरासरी ५३ टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यात सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासात केवळ ८.६३ टक्के मतदान झाले. त्यानंतरच्या सहा तासात म्हणजे दुपारी ३.३० पर्यत ३४.३७ टक्के मतदान झाले. शेवटच्या दोन तासात ५.३० पर्यत १० टक्के मतदान झाले. म्हणजेच सुरुवातीचे दोन व शेवटचे दोन अशा चार तासात १८.६३ टक्के मतदान झाले. सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सुुरुवातीला मतदारांची गर्दी नव्हती. मात्र ११.३० नंतर मतदानाचा वेग वाढत गेला. सायंकाळी अखेरच्या दोन तासात अनेक मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सायंकाळी ५.३० नंतरही रांगेत उभ्या असलेल्या मतदारांनी मतदान केले. त्यामुळे रात्री उशिरापर्यत प्रभागनहिाय मतदानाची टक्केवारी गोळा करण्याचे काम सुरू होते.(प्रतिनिधी) निवडणुकीतील व्यस्त कर्मचारी आज मतदान करणार निवडणूक प्रक्रियेत व्यस्त असलेले कर्मचारी व अधिकारी आपल्या मतदानाचा हक्क आज बजावणार आहे. बुधवारी दिवसभर तसेच गुरुवारी सकाळी १० पर्यंत पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून ते आपल्या पसंतीच्या उमेदवारांना मतदान करू शकतात. निवडणुकीतील कर्मचाऱ्यांना मागणीनुसार पोस्टल बॅलेट उपलब्ध करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त (निवडणूक) महेश धामेचा यांनी दिली.