रामटेक : त्रिपूर पाैर्णिमेच्या पर्वावर रामटेक शहरातील महात्मा गांधी चाैकात रक्तदान शिबिराचे रविवारी (दि. २९) आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात ५२ तरुणांनी रक्तदान केले.
याप्रसंगी युवा सेनेचे कमलेश शरणागत, शिवसेनेचे धर्मेश भागलकर, माजी सभापती बिकेंद्र महाजन, नगरसेवक सुमित काेठारी, ऋषिकेश किंमतकर, महेश बिसेन, विश्वास पाटील, हिमांशु पानतावणे, सचिन संगीतराय, विद्याधर महाजन, चेतन काेठेकर, राहुल हटवार, साैरभ संगीतराय, राहुल थाेटे, बिट्टू महाजन उपस्थित हाेते. नागपूर येथील इंदिरा गांधी मेडिकल हाॅस्पिटल (मेयाे)च्या चमूने रक्तसंकलन कार्य केले. राहुल टाेंगसे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर पिंटू काेसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.