शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांमुळे ५ हजारांवर लोकांना अंधत्व

By admin | Updated: October 22, 2014 01:04 IST

दिवाळीतील आनंदाचे, उत्साहाचे प्रतीक म्हणजे फटाके. परंतु या फटाक्यांमुळे देशात दरवर्षी सुमारे पाच हजारांवर लोकांची दृष्टी जाते. डोळ्यांना इजा करणाऱ्या फटाक्यांमध्ये अनार ६० टक्के, सुतळी बॉम्ब

नागपूर : दिवाळीतील आनंदाचे, उत्साहाचे प्रतीक म्हणजे फटाके. परंतु या फटाक्यांमुळे देशात दरवर्षी सुमारे पाच हजारांवर लोकांची दृष्टी जाते. डोळ्यांना इजा करणाऱ्या फटाक्यांमध्ये अनार ६० टक्के, सुतळी बॉम्ब ३० टक्के, चक्री आणि रॉकेट १० टक्के व इतर फटाक्यात १० टक्के प्रमाण आहे, अशी माहिती मेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे विभागप्रमुख डॉ. अशोक मदान यांनी दिली. फटाक्यांमुळे होणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण जागतिक पातळीवर पाच लाख आहे. डॉ. मदान यांनी सांगितले, फटाक्यात चारकोल, गंधक, नायट्रेट, क्लोरेट, परफ्लोरेट आदी घटक असतात. या घटकाचा निर्जीव आणि जीवित दोघांवरही दुष्परिणाम होतो. फटाका फुटल्यानंतर निघणारा धूर डोळ्यांना व फुफ्फुसांना तसेच त्वचेला अपायकारक असतो. त्यामुळे दमा व अ‍ॅलर्जीचे प्रमाण वाढते. फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण, वायुप्रदूषण व सामाजिक प्रदूषण होते. फटाके फोडलेल्या ठिकाणाचे तापमान ४०० ते ५०० डिग्रीपर्यंत वाढते. फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. यातील ६० टक्के व्यक्ती हे २० वर्षांखालील असतात. यात पुरुषांची संख्या ८० टक्के असते. फटाके फोडणाऱ्यांपेक्षा बघणाऱ्यांना याची जास्त बाधा होते. कारण, स्फोटामुळे दगड, माती वेगाने उडते व डोळ्याला आणि इतर अवयवांना इजा होऊ शकते. फटाक्यात जळती ठिणगी किंवा घटक गेल्यास डोळा कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. दृष्टिहीनता, अंधत्व व गंभीर दुखापतींमुळे डोळा काढावा लागू शकतो. बारुदमुळे डोळ्यांना रासायनिक इजा होऊ शकते. (प्रतिनिधी)