शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ५०० रुपयांच्या खंडणीसाठी हत्येचा प्रयत्न; पानटपरीचालक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 16:06 IST

पान टपरी चालकाने ५०० रुपयांची खंडणी दिली नाही म्हणून त्याच्यावर चाकूचे घाव घालून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न यशोधरानगरातील चार गुंडांनी केला. सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली.

ठळक मुद्देचाकूने भोसकले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पान टपरी चालकाने ५०० रुपयांची खंडणी दिली नाही म्हणून त्याच्यावर चाकूचे घाव घालून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न यशोधरानगरातील चार गुंडांनी केला. सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. समीर अहमद जाकीर अहमद शेख (वय ३२) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.यशोधरानगरातील आयेशा मशिदीजवळ समीर अहमद राहतो. त्याची राजीव गांधी नगरातील उड्डाणपुलाखाली पान टपरी आहे. सोमवारी दुपारी १२. ३० वाजता तो बसून असताना या भागातील गुंड समीर खान समशेर खान (वय २५) त्याच्या तीन साथीदारांसह पान टपरीवर आला. आरोपी खान याने समीरला पान टपरीच्या बाहेर बोलविले. नंतर त्याची कॉलर पकडून त्याला अश्लील शिवीगाळ केली. ५०० रुपये दे नही तो जान से मार दुंगा, असे आरोपी म्हणाला. समीरने पैसे नाही म्हणताच आरोपीने त्याच्या कंबरेत असलेला चाकू बाहेर काढून समीरच्या पोटात भोसकण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत समीर पलटला असता तो चाकू त्याच्या पाठीत खुपसला गेला. तशाही अवस्थेत जीव वाचविण्यासाठी समीर पळू लागला. आरोपी खान आणि त्याच्या तीन साथीदारांनी जखमी समीरचा पाठलाग करून त्याला पकडले. त्यांनी त्याच्यावर पुन्हा चाकूचा वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, समीरने जीवाची याचना करीत त्याच्याजवळचे ३०० रुपये आरोपीच्या हातात दिले. त्यामुळे पैसे घेऊन शिवीगाळ करीत आरोपी पळून गेले. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. जखमी समीरला परिसरातील काही जणांनी डॉक्टरकडे पोहचविले. तेथून माहिती मिळाल्याने यशोधरानगर पोलिसांनी रुग्णालयात पोहचून समीरचे बयाण नोंदविले. त्यावरून आरोपी समीर खान समशेर खान आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

 

टॅग्स :Murderखून