शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

५०० कोटी बदलले, व्यवहारात मात्र १०० कोटीच

By admin | Updated: November 19, 2016 02:30 IST

५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर घरी असलेल्या जुन्या नोटा लोकांनी बँकांपुढे मोठ्या रांगा लावून बदलवून घेतल्या.

बाजारपेठांमध्ये मंदीचे सावट : खर्चाला बसला चाप मोरेश्वर मानापुरे  नागपूर५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर घरी असलेल्या जुन्या नोटा लोकांनी बँकांपुढे मोठ्या रांगा लावून बदलवून घेतल्या. पण त्या नोटा खर्च करण्याची लोकांची मानसिकता नाही. त्यांच्यामध्ये निर्माण झाली भीती आणि काटकसरीमुळे बाजाराची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे सर्वच बाजारपेठा ओस पडल्या आहेत. व्यवसायात ३० टक्क्यांपर्यंत घसरणकेंद्र सरकारचा काळ्या पैशाच्या विरोधातील सर्जिकल स्ट्राईकनंतर गेल्या आठ दिवसात लोकांनी राष्ट्रीयीकृत, खासगी आणि नागरी अर्बन बँकांच्या नागपुरातील ५५० पेक्षा जास्त शाखांमधून जवळपास ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त जुन्या नोटा बदलवून घेतल्या आणि त्या घरीच ठेवल्या. त्यातील १०० कोटीसुद्धा व्यवहारात नाहीत. त्यामुळे बाजाराची आर्थिक उलाढाल ठप्प पडली आहे. सर्वच बाजारपेठांमधील व्यवहारात ३० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. दुकानदार चिल्लर नोट देण्यास तयार नाहीत. कापड आणि सराफा बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. थोडी फार खरेदी धान्य आणि खाद्यतेल बाजारात सुरू आहे. ग्राहक किरकोळ दुकानातून केवळ जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करीत आहेत. १०० व २००० च्या नोटांमध्ये मोठी तफावतअर्थतज्ज्ञांनी सांगितले की, २००० ची नवीन नोट आणि चलनातील १०० ची नोट यात मोठी तफावत आहे. शिवाय नवीन ५०० रुपयांची नोट चलनात अजूनही न आल्यामुळे लोक १०० रुपयाची नोट खर्च करण्यास तयार नाहीत. शिवाय दुकानदार २००० हजार रुपयाच्या नोटेची चिल्लर देत नाही. दुसरी बाजू पाहिल्यास कॅशलेस व्यवस्थेत नागपुरातील ९५ टक्के दुकानदारांकडे डेबिट कार्डने पैसे स्वीकारण्यासाठी ‘टेलर मशीन’ उपलब्ध नाहीत. त्यामुळे आर्थिक उलाढालीत मोठी घसरण झाली आहे. ५०० रुपयांची नवीन नोट जेव्हा नागरिक आणि दुकानदारांच्या हातात येईल, तेव्हाच लोक खरेदीसाठी घराबाहेर पडणार आहेत. त्यावेळी दुकानदारांनाही खरेदीनंतर लोकांना चिल्लर नोट देणे शक्य होईल. तेव्हाच बाजारात उत्साह संचारेल. पण अशी सकारात्मक स्थिती निर्माण होण्यासाठी निश्चितच महिन्याचा कालावधी लागणार आहे. दोन दिवसातच ५०० ची नवीन नोटबॅँक आॅफ महाराष्ट्रचे नागपूर विभागीय उपमहाव्यवस्थापक विजय कांबळे यांनी सांगितले की, ५० आणि १०० रुपयांच्या नोटा लोकांनी घरीच ठेवल्या आहे. ते आवश्यक तेवढीच खरेदी करीत आहेत. ५०० रुपयाची नवीन नोट चलनात आल्यानंतर १०० आणि २००० रुपये यातील गॅप भरून निघेल आणि लोक मोठ्या प्रमाणात १०० रुपयांचे चलन बाजारात आणतील. दोन दिवसातच ५०० रुपयाची नोट चलनात येणार आहे. कांबळे म्हणाले, २००० हजाराची नोट आकारात छोटी आहे. शिवाय ५०० च्या नवीन नोटेचा आकारही पूर्वीच्या नोटेपेक्षा लहान आहे. लोकांना एटीएममधून सर्वच नोटा मिळाव्यात म्हणून बँकांच्या एटीएम मशीनमधील ट्रेमध्ये वास्तविक बदल करण्यात येत आहेत. आता १०० आणि २००० रुपयाची नोट एटीएममधून मिळत आहे. पुढे लोकांना १००, ५०० आणि २००० रुपयाची नोट सहजपणे मिळेल. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच लोकांच्या खिशात पैसा खेळता राहील आणि बाजारपेठांमध्ये उत्साह येईल. पण यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल, असे कांबळे यांनी स्पष्ट केले.