शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

 राज्याचे ५०० कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यात; केंद्र शासनाचाही निधी लवकरच मिळणार

By आनंद डेकाटे | Updated: May 24, 2023 17:54 IST

Nagpur News राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे संबंधित महाविद्यालय तसेच विद्यार्थ्याच्या आधार संलग्नीकृत बँक खात्यामध्ये यशस्तीरित्या वितरित करण्यात आला आहे. तसेच केंद्र शासनाचाही ६० टक्के शिष्यवृत्तीच्या हिश्श्याची रक्कम लवकरच संबंधित महाविद्यालय तसेच विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

आनंद डेकाटे नागपूर : राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिक्षण हित व त्याची मागणी लक्षात घेता राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने राज्यातील व केंद्र शासनातील संबंधित तांत्रिक यंत्रणांशी समन्वय साधून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता सुमारे ४,०६,५८३ लाभार्थी विद्यार्थ्यांना ५४७.५२ कोटी रूपयाचा राज्याचा ४० टक्के हिस्सा राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे संबंधित महाविद्यालय तसेच विद्यार्थ्याच्या आधार संलग्नीकृत बँक खात्यामध्ये यशस्तीरित्या वितरित करण्यात आला आहे. तसेच केंद्र शासनाचाही ६० टक्के शिष्यवृत्तीच्या हिश्श्याची रक्कम लवकरच संबंधित महाविद्यालय तसेच विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देय असलेल्या शिष्यवृत्तीच्या लाभाच्या वितरण पध्दतीमध्ये सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांनी सुधारणा केलेली आहे. त्यानुसार राज्यशासनाच्या ४० टक्के हिश्याची निर्वाह भत्याची रक्कम विद्यार्थ्याच्या आधार संलग्नीकृत बँक खात्यामध्ये तर महाविद्यालयाची ४० टक्के हिश्याची शुल्काची रक्कम संबंधीत महाविद्यालयाच्या बँक खात्यामध्ये करण्यात येत आहे. मात्र केंद्र शासनाच्या ६० टक्के हिश्याची निर्वाह भत्ता व महाविद्यालयाच्या शुल्काची ६० टक्के रक्कम केंद्र शासना मार्फत थेट विद्यार्थ्याच्याच आधार संलग्नीकृत बँक खात्यामध्ये अदा करण्यात येत आहे. तथापि, सन २०२१-२२ पासून केंद्र शासनाने केंद्र हिश्याच्या ६० टक्के सुधारीत केलेल्या वितरणपद्धती विरुध्द राज्यातील महाविद्यालयांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला असून सद्यस्थितीत न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आलेल्या आहेत.

२०२२-२३ करिता ५०४.७५ कोटी रूपयाची अदायगी महाडीबीटी पोर्टलमार्फत करण्यात येत आहे. चालू शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ करिता शिष्यवृतीचे अर्ज ऑनलाईन भरावयाची सुविधा महाडीबीटी पोर्टलवर लवकरच उपलब्ध होणार असून, राज्यातील विद्यार्थ्यांना व महाविद्यालयांना अर्ज परिपूर्ण भरून मंजुरीस्तव संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयांकडे अग्रेशित करावेत.- डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण

टॅग्स :Studentविद्यार्थी