शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ५० झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण पूर्ण  : ५०० लोकांना पट्टेवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 21:55 IST

नागपूर शहरात ४३४ झोपडपट्ट्यात आहेत. शासन निर्णयानुसार झोपडपट्टीधारकांना मालकीपट्टे वाटपासाठी ५० झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यात महापालिकेच्या जागेवरील ११ झोपडपट्ट्यांचा समावेश असून यातील ५०० झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या १७ नोव्हेंबर २०१८ च्या निर्णयानुसार मालकीपट्टेधारक बँकाकडून कर्ज मिळण्यास पात्र असल्याची माहिती गुरुवारी सर्वसाधारण सभेत महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

ठळक मुद्दे१५००चौ.फूटाहून अधिक बांधकाम नियमित अवैध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात ४३४ झोपडपट्ट्यात आहेत. शासन निर्णयानुसार झोपडपट्टीधारकांना मालकीपट्टे वाटपासाठी ५० झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यात महापालिकेच्या जागेवरील ११ झोपडपट्ट्यांचा समावेश असून यातील ५०० झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या १७ नोव्हेंबर २०१८ च्या निर्णयानुसार मालकीपट्टेधारक बँकाकडून कर्ज मिळण्यास पात्र असल्याची माहिती गुरुवारी सर्वसाधारण सभेत महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.सर्वांसाठी घरे २०२२ च्या धोरणाची नागपूर शहरात प्रभावी अंमलबाजवणी व्हावी यासाठी महापालिकेच्या भाडेपट्टा वाटप कक्षाकडून सभागृहात याबाबतचा प्रस्ताव आणला होता. महाराष्ट्र शासनाने ६ मार्च २०१९ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार भाडेपट्टा मिळणारी प्रत्येक व्यक्ती त्याच्या अधिकारात आलेले घर तारण ठेवून शिक्षण अथवा अन्य कुठल्याही कारणासाठी कुठल्याही बँकेकडून कर्ज मिळण्यासाठी पात्र ठरणार असल्याची माहिती सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली.नासुप्रच्या जागेवर वसलेल्या जागेवरील अतिक्रमणधारकांना पट्टे देणे, स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात असलेल्या सर्व शासकीय विभागाच्या (वनविभाग वगळून) जमिनीवरील असलेली अतिक्रमणे नियमानुकूल करून भाडेपट्टा देणे, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल करून भाडेपट्टे देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने मनपा क्षेत्रात विधानसभा मतदारसंघनिहाय असलेल्या झोपडपट्टीतील नागरिकांची माहिती गोळा करण्यासाठी प्रति दोन मतदारसंघ मिळून एक अशा तीन एजन्सीची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मेश्राम यांनी दिली.५०० चौरस फूटाहून अधिक बांधकाम नियमित होणार की नाही, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. १५०० चौरस फूटाहून अधिक बांधकाम असल्यास ते नियमित होणार नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. देण्यात येणारा भाडेपट्टा ३० वर्षांसाठी  राहणार आहे.यासाठी शासन निर्णयानुसार भाडे आकारले जाणार आहे.१३ हजारांवर कुटुंबांचे सर्वेक्षणशहरातील महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टीतील १३०२२ हजारांवर कुटुंबांचे सर्वेक्षण केले आहे. मनपा मालकीच्या जागेवरील ११ झोपडपट्ट्यांमधील ४७०० कुटुंबांची माहिती संकलित झाली आहे. ५०० झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप करण्यात आले आहे तर नझुलच्या जागेवर असलेल्या झोपडपट्ट्यांमधील पात्र लाभार्थींची अंतिम माहिती नझुल आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे मनपाकडून पाठविण्यात आली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका