शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कट्टा ५० किग्रॅचा; धान्य ४५ किग्रॅ!

By admin | Updated: July 23, 2016 03:22 IST

शासनाने सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय पोषण आहार योजना लागू केली. यात विद्यार्थ्यांना शाळेत मध्यान्ह भोजन दिले जाते.

शालेय पोषण आहार : क्विंटलमागे १० किलो धान्य कमी शरद मिरे भिवापूर शासनाने सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय पोषण आहार योजना लागू केली. यात विद्यार्थ्यांना शाळेत मध्यान्ह भोजन दिले जाते. यासाठी लागणाऱ्या धान्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी खासगी एजन्सीकडे सोपविण्यात आली. या एजन्सीमार्फत भिवापूर तालुक्यात पुरविण्यात आलेल्या धान्याच्या अर्थात तांदळाच्या वजनात तूट असल्याचे निदर्शनास आले आहे. तांदळाचा प्रत्येक कट्टा (पोती) ५० किलो वजनाचा असून, त्यात प्रत्यक्षात ४५ किलो तांदूळ असल्याचे आढळून आले. त्यामुळे क्विंटलमागे १० किलो धान्याचा कमी पुरवठा करून एक क्व्ािंटल धान्याची किंमत शासनाकडून वसूल केली जात आहे. भिवापूर तालुक्यातील जवळी येथील जिल्हा परिषद विद्यालयात शुक्रवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. या शाळेची पटसंख्या १९८ आहे. शाळेतील शालेय पोषण आहार धान्याचा साठा संपत आल्याने शाळा व्यवस्थापनाने संबंधितांकडे ९९८ किलो धान्याची मागणी नोंदविली. त्यानुसार एजन्सीने शुक्रवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास या शाळेला धान्याचा पुरवठा केला. सदर धान्य एमएच-३१/एम-५१९८ क्रमांकाच्या वाहनाने शाळेच्या आवारात आणण्यात आले. सदर धान्याचे कट्टे शाळेत उतरविण्यात आले. दरम्यान, शाळेतील कर्मचाऱ्याला या ५० किलोच्या कट्ट्याच्या वजनाविषयी संशय आल्याने त्याने वाहनासोबत आलेल्या एजन्सीच्या व्यक्तीला सदर धान्य मोजून देण्याची विनंती केली. या कट्ट्याचे वजन केले असता, प्रत्येक कट्ट्यात चार ते पाच किलो धान्य कमी असल्याचे निदर्शनास आले. एकूण २० कट्ट्यांमध्ये एक क्व्ािंटल धान्य कमी असल्याचे आढळून आले. प्रत्येक महिन्याला या शाळेसोबत तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेला एजन्सीमार्फत धान्याचा पुरवठा केला जातो. प्रत्येक वेळी कुणीही धान्याचे वजन करण्याच्या भरीस पडले नाही. त्यामुळे कमी धान्याचा पुरवठा करीत शासनाला लाखो रुपयांनी चुना लावल्याची शक्यता नाकारता येत नाही. महिन्याला लाखो रुपयांचा घोटाळा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १०७ प्राथमिक आणि दोन माध्यमिक शाळा आहेत. शिवाय, खासगी शाळांची संख्याही बरीच मोठी आहे. या सर्व शाळांना शिक्षण विभागामार्फत एजन्सीद्वारे नियमित धान्यपुरवठा केला जातो. प्रत्येक शाळेत तांदळाचे ५० किलो वजनाचे कट्टे दिले जातात. जेवढी मागणी त्याप्रमाणे शाळेला तांदळाचे कट्टे पुरविले जातात. सदर कट्टे सीलबंद राहात असल्याने त्यांच्या वजनाविषयी कुणीही अविश्वास व्यक्त करीत नाही. ही बाब एजन्सीच्या पथ्यावर पडणारी आहे. दुसरीकडे कोणत्याही शाळेत कधीच धान्य स्वीकारताना वजन केले जात नाही. जवळी शाळेतील प्रकार अन्य शाळांच्या बाबतीत घडू शकतो. या व्यवहारात लाखो रुपयांचा घोळ केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अधीक्षकांकडे तक्रार आम्ही नेहमीच धान्य मोजमाप केल्यानंतर स्वीकारतो. धान्य कमी आढळल्यास ते एजन्सीच्या संबंधित व्यक्तीला परत करतो. शुक्रवारी धान्य कमी असल्याचे आढळून आले. याबाबत शालेय पोषण आहार अधीक्षकांकडे लगेच तक्रार केली. - आर. डब्ल्यू. लामगे, शिक्षक एजन्सीसोबत संपर्क नाही या प्रकाराबाबत माहिती मिळाली. पोषण आहार वितरणाचे काम जिल्हास्तरावरून होते. त्यामुळे आमच्याशी एजन्सीचा फारसा संपर्क येत नाही. या प्रकाराबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविण्यात येईल. शिवाय, प्रत्येक शाळांनी धान्य मोजमाप करून घ्यावे. - प्रभाकर मेहरे, गट शिक्षणाधिकारी, भिवापूर.