शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ५० कोटींचे स्पाईनल इन्जुरी व स्पोर्ट्स सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 13:35 IST

नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) २५ कोटींची इमारत व २५ कोटींची यंत्रसामग्री असे मिळून ५० कोटींचे ‘स्पाईनल इन्जुरी व स्पोर्ट्स सेंटर’ उभे करणार आहे.

ठळक मुद्देपाठीच्या कण्याच्या जखमी रुग्णांवर विशेष उपचारमेडिकलचा प्रस्ताव

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाढते अपघात, जोखमीचे शारीरिक खेळ व आजारामुळे पाठीचा कण्याला इजा होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत आहे. यात बहुसंख्य जखमींवर उर्वरित आयुष्य खाटेवर किंवा व्हीलचेअरवर घालवावे लागते. याला गंभीरतेने घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) २५ कोटींची इमारत व २५ कोटींची यंत्रसामग्री असे मिळून ५० कोटींचे ‘स्पाईनल इन्जुरी व स्पोर्ट्स सेंटर’ उभे करणार आहे.केंद्र शासनाच्या सामाजिक न्यायविभागाच्या पुढाकाराने नागपूरच्या मेडिकलमध्ये दोन वर्षांपूर्वी ‘स्टेट स्पाईनल इंज्युरी सेंटर’ उभारण्याला मंजुरी मिळाली होती. पाच कोटींच्या ‘सीएसआर’ निधीतून हे सेंटर उभे राहणार होते. या संदर्भातील प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला होता. परंतु त्रुटी काढून वारंवार परत पाठविण्यात आला.शिवाय, हे सेंटर केवळ १० खाटांचे होते. त्या तुलनेत रुग्णांची संख्या बरीच मोठी आहे. यामुळे हा प्रकल्प बाजूला ठेवत मेडिकल प्रशासनाने नव्या ‘स्पाईनल इन्जुरी व स्पोर्ट्स सेंटर’चा प्रस्ताव तयार केला आहे. येथे अद्ययावत उपचारासोबतच रुग्णांच्या पुनर्वसनाकडे लक्ष दिले गेले आहे.६० खाटा, दोन शस्त्रक्रियागृह व अतिदक्षता विभागमेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा म्हणाले, जुन्या प्रस्तावात केवळ ‘स्पाईनल इन्जुरी सेंटर’ होते. नव्या प्रस्तावात ‘स्पोर्ट्स’ अंतर्भूत करण्यात आले आहे. यामुळे व्याप्ती वाढली आहे. ‘स्पाईन, स्पोर्ट्स इन्जुरी सेंटर’ हे ६० खाटांचे असेल. दोन शस्त्रक्रिया गृह व पाच खाटांचे अतिदक्षता विभाग असणार आहे. विशेष म्हणजे, सेंटरचा ४० टक्के भाग हा पुनर्वसनाचा असणार आहे. यामुळे रुग्णाला लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न असेल.अद्ययावत तंत्रज्ञाननव्या प्रस्तावित सेंटरमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘स्पाईनल सर्जरी’सह मणक्याची बिनटाक्याची शस्त्रक्रिया केली जाईल. रेडिओफ्रिक्वेन्सी लहरी व लेझर या प्रगत-शास्त्रीय उपकरणांद्वारे कुठल्याही प्रकारची चिरफाड न करता रुग्ण वेदनामुक्त शस्त्रक्रिया येथे होतील. एक्स-रे (सी-आर्म) वर सुईचे टोकाद्वारे मणक्यावर शस्त्रक्रिया होतील. हे सेंटर ‘ट्रॉमा केअर सेंटर’च्या अगदी समोर उभारले जाणार आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय