चंद्रपूर जिल्ह्यातील दोघे जेरबंद : एटीएसची कारवाईनागपूर : बांगला देशातून पाच लाखांच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील दोघांना दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्यांनी जेरबंद केले. शेख गफ्फार आणि शेख सत्तार अशी या दोघांची नावे आहेत. ते जिवती (जि. चंद्रपूर) येथील रहिवासी आहेत. काही दिवसांपूर्वी एटीएसने अशाच प्रकारे बनावट नोटा घेऊन आलेल्या आरोपींना पकडले होते. त्यांच्या अटकेतून उघड झालेल्या नेटवर्कमधील काहींवर एटीएसने नजर ठेवली होती. त्यातील शेख गफ्फार आणि शेख सत्तार यांचे लोकेशन काही दिवसांपूर्वी मालदा (बांगलादेश) कडे आढळले. मालदा हे बनावट नोटा तयार करण्याचे आणि भारतात वितरित करण्याचे मोठे केंद्र आहे. त्यामुळे एटीएसने या दोघांवर पाळत ठेवली होती. बुधवारी ते नागपूरकडे येत असल्याचे स्पष्ट झाले. पहाटे या दोघांचे लोकेशन नागपूर रेल्वेस्थानकावर दिसल्यामुळे आधीच तयारीत असलेल्या एटीएसच्या पथकाने त्यांना जेरबंद करण्याची योजना बनविली. शेतमालाच्या आड नोटांचा व्यवहारआरोपी गफ्फार आणि सत्तार हे गावात शेतमालाच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करतात. माल विकत घेण्याच्या बदल्यात ते या बनावट नोटा देऊन विक्रेत्यांची फसवणूक करीत होते. सोबतच चंद्रपूर जिल्ह्यात ते या नोटा विकण्याचाही व्यवहार करीत असावे, असा संशय आहे. एटीएसच्या पथकाचे स्थानिक प्रमुख व्ही. डी. मिश्रा, विजय आकोत, एपीआय संजय नाईक, अमर धंदर, पीएसआय प्रशांत भोयर, रमेश बेव्हरीया आदींनी ही कामगिरी बजावली.
पाच लाखांच्या बनावट नोटा जप्त
By admin | Updated: November 19, 2015 03:27 IST