शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

उपकरणांच्या खरेदीसाठी नागपूरच्या मेया इस्पितळाला पाच कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 21:16 IST

मेयोच्या सुवर्ण महोत्सवाच्यानिमित्ताने रुग्णसेवा आणखी अद्ययावत व्हावी, या हेतूने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खनिकर्म निधीमधून पाच कोटी रुपये देण्याची घोषणा सोमवारी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित आढावा बैठकीत केली.

ठळक मुद्देआढावा बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणासुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने रुग्णहित जपण्याचा दिल्या सूचना

ऑनलाइन लोकमत 

नागपूर : मेयोच्या सुवर्ण महोत्सवाच्यानिमित्ताने रुग्णसेवा आणखी अद्ययावत व्हावी, या हेतूने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खनिकर्म निधीमधून पाच कोटी रुपये देण्याची घोषणा सोमवारी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित आढावा बैठकीत केली. यावेळी पालकमंत्र्यांनी कोणत्या विभागाला किती निधी द्यायचा, यावरही संबंधित प्रमुखांशी चर्चा केली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही दिल्या.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) ५० वर्षे पूर्ण होत आहेत. २२ ते २४ डिसेंबरदरम्यान सुवर्ण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री बावनकुळे यांनी ही बैठक बोलविली होती. यावेळी त्यांनी खनिकर्म निधीमधून मिळणाºया ९० कोटी रुपयांमधून पाच कोटी रुपये मेयोला उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती दिली. हा निधी रुग्णालयाला आवश्यक यंत्रसामुग्री खरेदी करण्याच्या सूचनाही दिल्या. विशेष म्हणजे, पालकमंत्र्यांनी लगेच खनिकर्म विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना याविषयी फोनवरून माहिती दिली, सोबत नागपूर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याशीही फोनवरून संपर्क साधून मेयो रुग्णालयासाठी हा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. या निधीच्या खर्चावर उपस्थित विविध विभागांच्या प्रमुखांशी चर्चा केली तसेच सायंकाळपूर्वी प्रस्ताव तयार करून त्याची मंजुरी घेण्याचे निर्देशही दिले. यावेळी आ. विकास कुंभारे, अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे, अभ्यागत मंडळाचे सर्व सदस्य व रुग्णालयाचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.-पाळणाघराचा प्रस्तावअनेक रुग्ण माता आपल्या लहान मुलांसोबत उपचारासाठी रुग्णालयात येतात. त्या मुलांना पाहण्यासाठी नातेवाईक राहतोच असे नाही. अशा मुलांची आबाळ होऊ नये म्हणून परिचारिकांनी रुग्णालयात पाळणाघर सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनापालकमंत्र्यांनी दिल्या. मेयोच्या अभ्यागत मंडळाचे सदस्य डॉ. शिंगणे यांनी हे पळणाघर चालविण्यासाठी सामाजिक संस्थांची नेमणूक करावी, असेही ते म्हणाले.-थुंकणाºयांवरील कारवाईसाठी स्वच्छतादूतबावनकुळे म्हणाले, रुग्णालयाच्या आत थुंकणाºयांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या पाच स्वच्छतादूताची नेमणूक मेयोसाठी करण्यात येईल. हे स्वच्छतादूत रुग्णालयात फिरून थुंकणाºयांवर दंडात्मक कारवाई करतील.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलnagpurनागपूर