शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनोधैर्य योजनेत २६८ पीडितांना ५ कोटी ६५ लाख रुपयांची मदत

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: December 19, 2023 19:30 IST

या गुन्ह्यांना बळी पडलेल्या महिला व बालकांना ही योजना लागू आहे.

राकेश घानोडे, नागपूर : जिल्ह्यामध्ये २०२२ व २०२३ या दोन वर्षांत मनोधैर्य योजनेंतर्गत २६८ पीडितांना ५ कोटी ६५ लाख ३५ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. त्यामुळे पीडितांचे मनोधैर्य उंचावले. बलात्कार, इतर लैंगिक अत्याचार व ॲसिड हल्ला या गुन्ह्यांना बळी पडलेल्या महिला व बालकांना ही योजना लागू आहे.

१० लाखांपर्यंत अर्थसहाय्य

संबंधित गुन्ह्यांमुळे मृत्यू, मतिमंदत्व, शारीरिक अपंगत्व, शरीराच्या दृष्य भागाची हानी इत्यादी गंभीर परिणाम झाल्यास पीडितांना १० लाख रुपयांचे तर, इतर प्रकरणांत ३ लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य केले जाते. ही प्रक्रिया १२० दिवसांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे.

पीडितांच्या नावाने मुदतठेव

मंजूर आर्थिक मदतीमधील ७५ टक्के रकमेची पीडितांच्या नावाने आणि पीडित अज्ञान असल्यास पालकाच्या नावाने १० वर्षांकरिता बँकेत मुदतठेव केली जाते. उर्वरित २५ टक्के रकमेचा धनादेश पीडितांना अदा करण्यात येतो. त्यामध्ये घटनेनंतर तत्काळ मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या ३० हजार रुपयांचा समावेश असतो.

पुनर्वसनासाठी विविध सेवा

पीडितांचे पुनर्वसन व्हावे यासाठी विविध सेवाही योजनेंतर्गत दिल्या जातात. त्यामध्ये सर्व रुग्णालयांमध्ये मोफत वैद्यकीय उपचार, मानसिक आधाराकरिता प्रशिक्षित पथकाकडून समुपदेशन, कायदेशीर मार्गदर्शन, नोकरी व व्यवसायासाठी प्रशिक्षण इत्यादी सेवांचा समावेश आहे.

पीडितांचे नाव गोपनीय ठेवले जाते

पीडितांना आर्थिक मदत करण्यासाठी सिंगल विंडो सिस्टिम कार्यरत आहे. त्यानुसार, आर्थिक मदतीची मागणी करणारे अर्ज स्वीकारण्यापासून ते आर्थिक मदत पुरविण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे पूर्ण केली जाते. पीडितांचे नाव गोपनीय ठेवले जाते.- न्या. सचिन पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण.

टॅग्स :nagpurनागपूर