शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

डियो गँगच्या ५ आरोपींना अटक, जामिनावर झाली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 22:40 IST

महिलांसोबत अभद्र व्यवहार करून, युवकाला जखमी करणाऱ्या डियो गँगच्या ५ सदस्यांना पाचपावली पोलिसांनी अटक केली. पण आरोपी तात्काळ जामिनावर सुटल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये पोलिसांच्या विरोधात रोष पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये साठगाठ असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिलांसोबत अभद्र व्यवहार करून, युवकाला जखमी करणाऱ्या डियो गँगच्या ५ सदस्यांना पाचपावली पोलिसांनी अटक केली. पण आरोपी तात्काळ जामिनावर सुटल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख अनीस ऊर्फ सोनू शेख हनीफ (२६), शेख परवेज ऊर्फ गुड्डू पचपन शेख रमजान (३२), अब्दुल लतीफ ऊर्फ हनीफ अब्दुल करीम (४२), शेख अफजल शेख बशीर (२७) रा. बंगाली पंजा व अजय ऊर्फ छोटू सुखलाल उईके (२८) रा. लेंडीपुरा यांचा समावेश आहे.१९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता संभाजी कासार रोडवर गजेंद्र सावरकर यांची वहिनी दर्शना सावरकर शेजारच्या महिलांसोबत बसली होती. त्यावेळी घटनेचा सूत्रधार सोनू आपल्या चार ते पाच सहकाऱ्यांसोबत तिथे आला. सोनू व त्याचे साथीदार रेशनचे धान्य खरेदी करीत होते. आरोपी महिलांना शिवीगाळ करून वाद घालू लागले. दर्शनाच्या पतीने महिलांसोबत बरोबर वागा, असे सांगितल्यावर सोनू त्याला धमकावून निघून गेला. १५ मिनिटांनंतर शस्त्रे घेऊन १० ते १२ साथीदारांसोबत तो परत आला. त्याने दुचाकी वाहनांची तोडफोड केली. शुभमला तलवारीने मारून जखमी केले. दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीती निर्माण झाली होती.पाचपावली पोलिसांनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करून सोनू व त्याच्या चार साथीदारांना अटक केली. त्यांना न्यायालयात सादर केले असता, त्यांची जमानत झाली. परिसरातील नागरिकांना आरोपींना जामीन मिळाल्याच्या कारणावरून प्रश्न उपस्थित केले. पण पोलिसांनी नागरिकांना शांत करीत त्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचे सांगितले.सोनू डियो गँगचा सदस्यआरोपी सोनू डियो गँगचा सदस्य आहे. या टोळीद्वारे अवैध दारूची व मादक पदार्थाची विक्री करण्यात येते. पोलिसांनी नागरिकांचा रोष शांत करण्यासाठी आरोपींना अटक करून खानापूर्ती केल्याची नागरिकांची ओरड आहे. डियो गँगच्या सदस्यांनी लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात मोहाच्या दारूची विक्री केली. लॉकडाऊन संपल्याने ते रेशनच्या धान्याची खरेदी विक्री करीत आहेत. त्याचबरोबर ढिवरपुरा, झाडे चौक, लालगंज, बैरागीपुरा, बांगलादेश येथे दारूचे अड्डे चालवीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक