शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात  ११२०० झाडांवर ४.९५ कोटींचा खर्च :  ५६ रस्त्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 21:28 IST

‘एक व्यक्ती एक झाड, करू या शहर हिरवेगार’ या संकल्पनेनुसार महापालिकेने वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. यावर ४ कोटी ९४ लाख ५४ हजार ७६८ रुपये खर्च केला जाणार आहे.

ठळक मुद्देखासगी कंपनीवर जबाबदारी

लोकमत न्यूज नेवटर्कनागपूर : ‘एक व्यक्ती एक झाड, करू या शहर हिरवेगार’ या संकल्पनेनुसार महापालिकेने वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. शहरातील सिमेंट व डांबरी अशा ५६ रस्त्यांच्या दुतर्फा ११२०० झाडे लावणे, त्याची दोन वर्ष देखभाल करण्याची जबाबदारी महापालिकेच्या उद्यान विभागाने खासगी कंपनीकडे सोपविली आहे. यावर ४ कोटी ९४ लाख ५४ हजार ७६८ रुपये खर्च केला जाणार आहे.शहरातील सिमेंट काँक्रीट व डांबरी रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावून त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी मे.रेन्बो ग्रीनर्स कंपनीवर सोपविण्यात आली आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांवर नागरिकांचा आपल्या घरापुढे झाडे लावण्याला विरोध होतो. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेला झाडे लावण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. वृक्षारोपणावरील खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.मौजा दिघोरी येथील योगेश्वर नगर गृहनिर्माण संस्थेच्या मोकळ्या जागेत उद्यान विकसित करणार आहे. यावर ३६ लाख ९० लाखांचा खर्च अपेक्षित असून याबाबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविण्यात आला आहे.२० चौकांच्या सल्लागारावर ७३ लाखांचा खर्चशहरातील मुख्य २० चौकांची पुनर्रचना केली जाणार आहे. यासाठी आराखडा तयार करणाऱ्या सल्लागारावर प्रतिचौक ३.६९ लाखानुसार ७३ लाख ८ हजारांचा खर्च केला जाणार आहे. मे. यूम.एम.टी.सी. हैदराबाद कंपनीने याबाबतचा प्रस्ताव दिला आहे. वाहतूक विभागाने हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविला आहे.सिमेंट कामासाठी २५ कोटीमहापालिका क्षेत्रात समावेश करण्यात आलेल्या हुडकेश्वर भागातील श्री कॉलनी, दुबेनगर, रेणुकामातानगर, सावरबांधे सभागृहाजवळ, महालक्ष्मीनगर व राजापेठ परिसरात सिमेंटीकरण व नाली बांधकामासाठी १५ कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. यात महापालिकेचा वाटा ५ कोटीचा आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका